फोटो सौजन्य: @MahindraXUV3XO (X.com)
देशात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार विकल्या जातात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना भरघोस प्रतिसाद मिळताना दिसते. याच वाढत्या मागणीमुळे, अनेक ऑटो कंपन्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात.
देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट एसयूव्ही ऑफर करीत आहे. मात्र, जेव्हा विषय हाय परफॉर्मन्स आणि क्लासिक एसयूव्हीचा निघतो, तेव्हा आपसूकच महिंद्राचे नाव आपल्या समोर येते. कंपनीच्या एसयूव्हींची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातच आता कंपनीच्या एसयूव्हीचा वेटिंग पिरियड वाढताना दिसत आहे.
Mahindra XUV 3XO ही भारतीय मार्केटमधील परवडणाऱ्या कारपैकी एक मानली जाते. या कारची क्रेझ एवढी आहे की जर तुम्ही आजच या कारचा बेस व्हेरियंट बुक केला तर याची डिलिव्हरी एक वर्षानंतर होईल.
महिंद्रा XUV 3XO च्या काही व्हेरियंटसाठी वेटिंग पिरियड एक वर्षापर्यंत वाढला आहे. ताज्या अहवालानुसार, मे 2025 मध्ये त्याच्या बेस MXT (पेट्रोल) मॉडेलसाठी वेटिंग पिरियड एक वर्षापेक्षा जास्त आहे. चला या कारची किंमत जाणून घेऊयात.
ही कार लाँच झाल्यापासून कंपनीसाठी चांगली विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात 7 हजार 568 युनिट्स विकल्या गेल्या. कारची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.57 लाख रुपयांपर्यंत जाते.
महिंद्रा XUV 3XO बाजारात तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 82 किलोवॅट पॉवर आणि 200 एनएम टॉर्क जनरेट करते.
या कारमध्ये 1.2-लिटर TGDi पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे, जो 96 किलोवॅट पॉवर आणि 230 एनएम टॉर्क जनरेट करतो. या महिंद्रा कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील मिळते. हे डिझेल इंजिन ८६ किलोवॅट पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते.
महिंद्रा XUV 3XO च्या सर्वात स्वस्त मॉडेल, MX1 1.2-लिटर पेट्रोल व्हेरियंटची ऑन-रोड किंमत 9.09 लाख रुपये आहे. हे वाहन खरेदी करण्यासाठी 7.99 लाख रुपयांचे लोन मिळू शकते. या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजानुसार, दरमहा बँकेत एक निश्चित रक्कम EMI म्हणून जमा करावी लागेल.
महिंद्रा XUV 3XO चा सर्वात स्वस्त व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही चार वर्षांसाठी लोन घेतले आणि बँक या लोनवर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे 20,000 रुपयांचा EMI जमा करावा लागेल.