फोटो सौजन्य: Social Media
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल, आणि सीएनजीच्या किंमतीत झालेली वाढ. तसेच येणाऱ्या काळात जागतिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत इलेक्ट्रिक कार्सचा मोठा दबदबा असणार आहे. यामुळेच अनेक ऑटो कंपनीज सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
भारतात उत्तमोत्तम एसयूव्ही ऑफर करणारी वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आता लवकरच आपल्या दोन Electric SUV’s ला सादर करणार आहेत. कोणत्या सेगमेंटमध्ये कोणती SUV आणली जाईल? यात कोणत्या प्रकारचे फीचर्स असतील? या SUV कधी सादर होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
महिंद्रा लवकरच दोन नवीन इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही इलेक्ट्रिक कार कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये सादर करेल. महिंद्राने आपल्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत असताना, पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन्ही SUV ची माहिती देण्यात आली आहे.
महिंद्राने सोशल मीडियावर रिलीज केलेल्या पहिल्या टीझरमध्ये दोन नवीन इलेक्ट्रिक SUV ची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच त्यांची झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांच्या डिझाइन आणि फीचर्सची माहिती उपलब्ध आहे.
रिलीज करण्यात आलेल्या टीझरनुसार, BE 6e आणि XEV 9e अशा दोन एसयूव्ही सादर करण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील देण्यात येतील. ज्यामध्ये एलईडी लाईट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, एरो स्टाइल अलॉय व्हील्स, मस्क्युलर व्हील आर्च आणि क्लॅडिंग, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, ॲम्बियंट लाइट्स, ट्रिपल स्क्रीन यांसारखी फीचर्स असतील.
दोन्ही एसयूव्ही INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत. ज्यामध्ये बॅटरीच्या स्थितीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. दोन्ही SUV ला मोठी बूट स्पेस आणि ड्युअल इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा: बाईकचे टायर सतत घासले जातात का? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या लक्ष, नाही होणार प्रॉब्लेम
महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही एसयूव्ही 26 नोव्हेंबर 2024 रोजी वर्ल्ड प्रीमियर दरम्यान सादर केल्या जातील. या एसयूव्हीची स्पर्धा Tata Curvv EV, MG Windsor, ZS EV सोबत असेल तर XEV 9e थेट प्रीमियम SUV सोबत स्पर्धा करेल. याला टक्कर देण्यासाठी टाटा लवकरच Tata Harrier EV लाँच करणार आहे.