Honda Cars चा डबल धमाका, विक्रीसोबतच ऑल-न्यू 3rd Generation Honda Amaze चे टिझर केले रिलीज
भारतात दिवाळी येणाअगोदरच त्याची चाहूल लागली असते. म्हणूनच तर एक महिनाअगोदरच अनेक जण खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. ज्याप्रमाणे दिवाळीत नवीन कपडे, मिठाई आणि अन्य गोष्टी विकत घेतल्या जातात त्याप्रमाणे अनेक जण नवीन कर सुद्धा विकत घेत असतात. हाच सणासुदीचा काळ होंडा कंपनीसाठी सुवर्ण काळ ठरला आहे.
जपानी वाहन निर्माता कंपनी होंडा देशात अनेक उत्तोमोत्तम कार्स लाँच करत असते. यंदाची दिवाळी कंपनीसाठी अधिकच गोड ठरली आहे. याचे कारण म्हणजे कंपनीची वाढती विक्री. देशांतर्गत कंपनीच्या कार्सची विक्री जरी कमी झाली असली तरी कार्स निर्यातीत कंपनीने बाजी मारली आहे.
हे देखील वाचा: बाईकचे टायर सतत घासले जातात का? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या लक्ष, नाही होणार प्रॉब्लेम
होंडा कार्स इंडिया लिमीटेड (HCIL) या भारतातील आघाडीच्या प्रिमियम कार उत्पादक कंपनीने ऑक्टोबर 2024 मध्ये एकूण 10,080 युनिट्सची विक्री नोंदवली. ऑक्टोबर 24 मध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री 5,546 युनिट्स आणि निर्यात 4,534 युनिट्सवर होती.
श्री कुणाल बहल, उपाध्यक्ष, मार्केटिंग आणि सेल्स, होंडा कार्स इंडिया लिमीटेड म्हणाले, “ऑक्टोबरमध्ये नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, धनत्रयोदशी आणि त्याच महिन्यात साजरी होणारी दिवाळी या सणासुदीच्या विक्रीच्या गतीने डीलरशिपवर ग्राहकांच्या डिलिव्हरीमध्ये जोरदार योगदान दिले. गेल्या काही महिन्यांच्या मंदावलेल्या क्रियाकलापांच्या तुलनेत यामुळे उद्योगातील मागणी निश्चितच वाढली आहे.”
होंडा लवकरच ॲमेझचे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे, जी कॉम्पॅक्ट सेडान म्हणून ऑफर केली जाईल. याआधी नवीन जनरेशन Honda Amaze चा पहिला टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या कारची डिझाईन आणि काही फीचर्सची माहिती टीझरमध्ये उपलब्ध आहे.
ही ऑल-न्यू 3rd जनरेशन होंडा अमेझ तरुण वर्गासाठी आणि आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन केलेली एक नाविन्यपूर्ण आणि स्टायलिश प्रीमियम कॉम्पॅक्ट सेडान आहे. भारतामध्ये एंट्री सेडान मधील विश्वसनीय आणि लोकप्रिय पर्यायाच्या रूपामध्ये आपला यशस्वी वारसा निर्माता करत, ऑल-न्यू अमेझमध्ये आजच्या गतिशील पिढीची जीवनशैली आणि आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी बोल्ड डिझाईन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि होंडाच्या विशिष्ट विश्वसनीयतेचे कॉम्बिनेशन केले गेले आहे.
2013 मध्ये भारतात पदार्पण केल्यापासून आणि त्यानंतर 2018 मध्ये दुसरी जनरेशन लाँच केल्यावर, होंडा अमेझ ने भारतीय ग्राहकांची मने जिंकणाऱ्या एंट्री सेडानमध्ये प्रीमियम स्टाइलिंगसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. ही कर स्टायलिश अपील, आराम, परफॉर्मन्स, सुरक्षितता आणि अतुलनीय मूल्य यासाठी प्रसिद्ध आहे. नवीन प्रवास सुरू करणाऱ्यांसाठी ही योग्य कार बनली आहे.
होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ताकुया त्सुमुरा म्हणाले, “होंडा अमेझ हे आमच्यासाठी आणि भारतातील आमच्या ग्राहकांसाठी नेहमीच एक खास उत्पादन राहिले आहे. एंट्री सेडानसाठी प्रीमियम स्टाइलिंगमध्ये अग्रगण्य म्हणून, होंडा अमेझ ने नेहमीच त्याच्या विभागातील डिझाइन आणि अत्याधुनिकतेसाठी मानक स्थापित केले आहेत. तिसऱ्या पिढीसह, आम्ही आमच्या आधुनिक भारतीय ग्राहकांना पूर्वी कधीही न केलेले प्रिमियम पॅकेज ऑफर करत याला पुढील स्तरावर नेण्यास उत्सुक आहोत.”