Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांना कोकणी हापूसची मेजवानी! गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ व ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शन

मुंबईत गिरगाव चौपाटी येथे २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल २०२६’ आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 08, 2026 | 08:03 PM
गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून 'मँगो फेस्टिव्हल' व 'कोकण प्रॉपर्टी' प्रदर्शन

गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून 'मँगो फेस्टिव्हल' व 'कोकण प्रॉपर्टी' प्रदर्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत ‘मँगो फेस्टिव्हल २०२६’ आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनाचे आयोजन
  • गिरगाव चौपाटी येथे आयोजन
  • मुंबईकरांना अनुभवता येणार कोकणी हापूसची चव आणि कोकणातील गुंतवणुकीच्या संधी
Girgaon Chowpatty परिसरात येत्या २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल २०२६’ आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. Yuva Vision आणि Brands Maker यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून मुंबईकरांना अस्सल कोकणी हापूसची चव आणि कोकणातील गुंतवणुकीच्या संधी एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहेत.

या महोत्सवाच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण Dattatray Bharne यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच, या महोत्सवामुळे कोकणातील आंबा उत्पादकांना योग्य बाजारपेठ मिळेल आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनामुळे गुंतवणूकदारांना एकाच छताखाली माहिती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

Eknath Shinde: “निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या”, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश

हे प्रदर्शन २४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत मॅकिचन ग्राउंड आणि हॉल येथे पार पडणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबईकरांना थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून दर्जेदार हापूस आंबे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे, त्यांची गुणवत्ता आणि थेट विक्री यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह खरेदीचा अनुभव मिळेल.

यासोबतच ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनात कोकणातील रिअल इस्टेट क्षेत्रातील विविध पर्याय मांडले जाणार आहेत. सेकंड होम, गुंतवणूक प्रकल्प आणि पर्यटनाशी निगडित प्रॉपर्टी याबाबत सविस्तर माहिती येथे उपलब्ध असेल. त्यामुळे कोकणात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा उपक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

IAS Transfer Maharashtra: आठवड्याभरात पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणाची कुठे वर्णी?

महोत्सवात कोकणी खाद्यसंस्कृतीलाही विशेष स्थान देण्यात आले आहे. आंब्यांव्यतिरिक्त कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि उत्पादनेही येथे उपलब्ध असतील. आयोजकांच्या मते, मुंबईकरांचा कोकणाशी असलेला जिव्हाळा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

Web Title: Mango festival and konkan property expo from april 24 at girgaon chowpatty mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी! गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार
1

Mumbai News : आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी! गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार

Summer Care Tips: उन्हाळ्यात दिवसभरात किती आंबे खावे? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
2

Summer Care Tips: उन्हाळ्यात दिवसभरात किती आंबे खावे? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

पंतप्रधानांच्या बनावट सहीच्या पत्राने खंडणीचा प्रयत्न; जाहिरात व्यावसायिकाला कारनामा उघड
4

पंतप्रधानांच्या बनावट सहीच्या पत्राने खंडणीचा प्रयत्न; जाहिरात व्यावसायिकाला कारनामा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.