Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Breaking News- डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (दि.७) घोषणा केली की, अमेरिका इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमत झाली आहे. त्यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 08, 2026 | 11:30 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 08 Apr 2026 11:30 AM (IST)

    08 Apr 2026 11:30 AM (IST)

    शाळेचा रिपोर्ट कार्ड घेऊन चिमुकला पोहचला कबरीजवळ, आईला हाक मारली अन्… हृदयस्पर्शी Video Viral

    अलिकडे सोशल मिडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक लहान मुलगा आईला आपला रिपोर्ट कार्ड दाखवण्यासाठी तिच्या कबरीजवळ पोहचल्याचे दिसून येते. आई नेहमीप्रमाणे आपल्याला शाबासकी देईल या भावनेने तो तिच्या कबरीजवळ जाऊन तिला हाक मारु लागतो पण आईचा तो आवाज त्याला पुन्हा ऐकू येणार नाही हे त्याच्या लक्षातच येत नाही.

  • 08 Apr 2026 11:30 AM (IST)

    08 Apr 2026 11:30 AM (IST)

    क्षणात आनंद शोकात! लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

    चंद्रपूरमध्ये मित्राच्या लग्नात डीजेवर नाचताना 25 वर्षीय तरुण अचानक कोसळला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

  • 08 Apr 2026 11:30 AM (IST)

    08 Apr 2026 11:30 AM (IST)

    खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट

    देशभरातील बिघडत चाललेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, स्कायमेट वेदरने २०२६ साठीचा आपला पहिला मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे आणि यावेळी चित्र अनिश्चित दिसत आहे. जूनमध्ये चांगली सुरुवात अपेक्षित असली तरी, जुलै ते सप्टेंबर दरम्यान पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. याचे मुख्य कारण अल निनोचे संभाव्य पुनरागमन असल्याचे म्हटले जात आहे.

  • 08 Apr 2026 11:23 AM (IST)

    08 Apr 2026 11:23 AM (IST)

    20 वर्षांची सेवा, शेवटी रक्तरंजित अंत! नोकराने मालकाची गळा चिरून केली हत्या

    गुरुग्राममध्ये 20 वर्षे काम करणाऱ्या नोकराने जुन्या वादाचा बदला घेत झोपेत मालकाची धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी 24 तासांत तपास करून आरोपीला दिल्लीतून अटक केली.

  • 08 Apr 2026 11:18 AM (IST)

    08 Apr 2026 11:18 AM (IST)

    Free Fire Max: केवळ इतक्या डायमंड्समध्ये क्लेम करा प्रिमियम ईमोट्स; गेममध्ये नवीन स्टेप अप ईव्हेंट सुरू

    फ्री फायर मॅक्समध्ये नवीन स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह झाले असून आता प्लेअर्सना अतिशय कमी डायमंड्समध्ये प्रीमियम ईमोट्स आणि इतर खास रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी आहे. या ईव्हेंटमध्ये लोकप्रिय ईमोट्स अनलॉक करता येणार आहेत.

  • 08 Apr 2026 10:53 AM (IST)

    08 Apr 2026 10:53 AM (IST)

    ‘Dhurandhar The Revenge’ लीक प्रकरणात FIR दाखल; टेलिग्रामवर 50-50 रुपयांत विक्रीचा धक्कादायक प्रकार

    बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ लीक प्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कॉपीराइट उल्लंघना अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली आहे.

  • 08 Apr 2026 10:43 AM (IST)

    08 Apr 2026 10:43 AM (IST)

    होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार! अमेरिकेसोबतच्या युद्धबंदीवर इराणकडून विजयाची घोषणा

    वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून जागतिक शांततेसाठी धोका ठरलेल्या इराण आणि अमेरिका संघर्षाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इराणने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परंतु ही केवळ युद्धबंदी आहे युद्धाचा अंत नाही, असाही कडक इशारा दिला आहे. सध्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणमध्ये युद्धबंदीचा विजय साजरा केला जात आहे.

  • 08 Apr 2026 10:33 AM (IST)

    08 Apr 2026 10:33 AM (IST)

    इराण संकटात पाकिस्तानची स्क्रिप्ट व्हाईट हाऊसने लिहिली? शहबाज शरीफ यांची ती ‘पोस्ट’

    पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif )सध्या एका विचित्र आणि मानहानीकारक परिस्थितीचा सामना करत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी आपण खूप मोठे ‘जागतिक नेते’ आहोत, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला आहे. मंगळवारी शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणवरील हल्ल्याची डेडलाईन वाढवण्याची विनंती केली होती. मात्र, ही पोस्ट ज्या प्रकारे केली गेली, त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान स्वतंत्र नसून ते अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचे उघड झाले आहे.

  • 08 Apr 2026 10:23 AM (IST)

    08 Apr 2026 10:23 AM (IST)

    होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत… इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प? शांतता टिकणार का?

    अखेर एक महिन्यांपासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्धा(US Iran War) ला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला.  ट्रम्प यांनी मंगळवारी (०७ एप्रिल २०२६) इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता युद्धविराम लागू झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या दोन आठड्यात इराणने मांडलेल्या अटींवर चर्चा सुरु होणार आहे. ट्रम्प इराणच्या अटी मान्य करणार का याकडे लक्ष लागले आहे.

  • 08 Apr 2026 10:13 AM (IST)

    08 Apr 2026 10:13 AM (IST)

    अमेरिका-इराण शस्त्रसंधीचा शेअर बाजारावर मोठा परिणाम! आज सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार

    अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराच्या घोषणेमुळे जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. आज ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ६८९ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,८४० च्या पातळीवर ट्रेड करत होता.

  • 08 Apr 2026 10:03 AM (IST)

    08 Apr 2026 10:03 AM (IST)

    हिंगोलीत धक्कादायक प्रकार! बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच लुटणारी टोळी जेरबंद

    हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनाच बनावट पोलीस बनून गंडा घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांच्या नावाने सामान्य नागरिकांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केली.

  • 08 Apr 2026 09:20 AM (IST)

    08 Apr 2026 09:20 AM (IST)

    ‘बिग बॉस मराठी’ ठरला महाराष्ट्रातील नंबर 1 रिॲलिटी शो

    सध्या चर्चेत असलेली मोठी बातमी म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील क्रमांक १ अ-काल्पनिक शो ठरला आहे. या आठवड्यात सर्वाधिक दर्शकसंख्या मिळवत या रिॲलिटी शोने अव्वल स्थान पटकावले आहे. ही कामगिरी प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रेमाची साक्ष देणारी आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं आहे.

  • 08 Apr 2026 09:15 AM (IST)

    08 Apr 2026 09:15 AM (IST)

    Stock Market Today: अमेरिका-इराण शस्त्रसंधीचा शेअर बाजारावर मोठा परिणाम!

    India Share Market Update: अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराच्या घोषणेमुळे जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. आज ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ६८९ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,८४० च्या पातळीवर ट्रेड करत होता.

  • 08 Apr 2026 09:08 AM (IST)

    08 Apr 2026 09:08 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: सोनं स्वस्त झालं, चांदी आजही स्थिर!

    Gold Rate Today: भारतात 8 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,983 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,734 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,237 रुपये आहे. भारतात 8 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,37,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,49,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,12,370 रुपये आहे. भारतात 8 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.

  • 08 Apr 2026 09:02 AM (IST)

    08 Apr 2026 09:02 AM (IST)

    US Iran Ceasefire : होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत… इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प?

    US Iran Ceasefire News in Marathi: तेहरान/वॉशिंग्टन : अखेर एक महिन्यांपासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्धा(US Iran War) ला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला.  ट्रम्प यांनी मंगळवारी (०७ एप्रिल २०२६) इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता युद्धविराम लागू झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या दोन आठड्यात इराणने मांडलेल्या अटींवर चर्चा सुरु होणार आहे. ट्रम्प इराणच्या अटी मान्य करणार का याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra to World Breaking News:  आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

दिलासादायक ! इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले सुरु होते. इराणकडूनही या जोरदार प्रत्युत्तर दिले जात होते. यामध्ये वित्तहानी, जीवितहानीही झाली आहे. मात्र, हे तिन्ही देश मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर मंगळवारी (दि.8) रात्री मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर –

Web Title: Maharashtra desh videsh live news 8th april breaking news politics economy top news live blog marathi breaking news maharashtra political news share market india ipl 2026 live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

अमली पदार्थ विक्रेत्यांवर मकोका लावणार; पुणे पोलिस आयुक्तांचा इशारा
1

अमली पदार्थ विक्रेत्यांवर मकोका लावणार; पुणे पोलिस आयुक्तांचा इशारा

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान
2

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!
3

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!

Pune : जिगरी मित्रांची आभाळाला गवसणी UPSC नागरी सेवा परीक्षेत यश !
4

Pune : जिगरी मित्रांची आभाळाला गवसणी UPSC नागरी सेवा परीक्षेत यश !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.