Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन

MINI Cooper SE India आणि MINI Paul Smith Edition भारतीय मार्केटमध्ये येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 17 शहरांमधील 18 विक्री केंद्रांवर बुकिंगची सुविधा सुरू झाली असून, या खास एडिशनमध्ये ब्रिटिश डिझायनरचा कोणता वेगळा टच पाहायला मिळणार आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 17, 2026 | 06:43 PM
MINI Cooper SE and Paul Smith Edition India Launch (फोटो सौजन्य-AI एआय)

MINI Cooper SE and Paul Smith Edition India Launch (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • MINI Cooper SE आणि Paul Smith Edition साठी भारतात प्री-लाँच बुकिंग सुरू करण्यात आली आहे.
  • Paul Smith Edition मध्ये Cooper S, Convertible आणि Cooper SE अशी 3 मॉडेल्स सादर होणार आहेत.
  • MINI India चे 17 शहरांमध्ये 18 विक्री केंद्रे आणि 36 शहरांमध्ये 51 सर्व्हिस टचपॉइंट्स आहेत.

लक्झरी कार मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख असलेल्या MINI India ने भारतीय कस्टमर्ससाठी MINI Cooper SE आणि MINI Paul Smith Edition या कारची प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे. या Electric MINI Cooper सोबतच Paul Smith Edition मध्ये खास डिझाइन आणि इंटरेस्टिंग कलरकोड पाहायला मिळणार आहे. MINI Electric Car खरेदी करण्याची इच्छा असलेल्या कस्टमर्सना देशभरातील कंपनीच्या डीलरशिपमध्ये जाऊन आपली आवड नोंदवता येणार आहे.

MINI Cooper SE मध्ये काय खास?

नवीन MINI Cooper SE India ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या कारमध्ये MINI ची पारंपरिक डिझाइन ओळख कायम ठेवत शहरी प्रवासासाठी योग्य आकार आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनवर भर दिला आहे. या कारमध्ये गो-कार्टसारखा ड्रायव्हिंग अनुभव मिळण्यावरही कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.

विशेष म्हणजे, प्री-लाँच बुकिंगची अनाउन्समेंट करताना कंपनीने या मॉडेलची किंमत आणि बॅटरीसंबंधी टेक्निकल माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे कारची किंमत, रेंज आणि इतर फीचर्स जाणून घेण्यासाठी कस्टमर्सना कंपनीच्या पुढील कन्फर्मेशनचा वाट पहावी लागणार आहे.

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री

Paul Smith Edition मध्ये 3 मॉडेल्सचा समावेश

MINI Paul Smith Edition ही खास एडिशन Cooper S, Convertible आणि Cooper SE अशा 3 मॉडेल्समध्ये सादर केली जाणार आहे. ब्रिटिश डिझायनर पॉल स्मिथ यांच्या सहकार्याने या कारमध्ये ‘Classic with a Twist’ ही संकल्पना वापरण्यात आली आहे. या एडिशनमध्ये बाहेरील आणि आतील बाजूस मिळून 20 पेक्षा जास्त खास डिझाइन बदल करण्यात आले आहेत.

या कारमध्ये Statement Grey, Inspired White आणि Midnight Black Metallic असे 3 रंग मिळतील. Statement Grey हा रंग 1959 मधील मूळ Mini Austin Seven च्या रंगावरून प्रेरित आहे. Inspired White हा जुन्या Classic Mini Beige रंगाची आठवण करून देतो. तर Midnight Black Metallic हा MINI च्या सध्याच्या रंगसंगतीमधील रंग आहे.

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

भारतात 18 विक्री केंद्रे, 51 सर्व्हिस टचपॉइंट्स

MINI India चे सध्या 17 शहरांमध्ये 18 विक्री केंद्रांचे नेटवर्क आहे. यात दिल्ली-एनसीआर, मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोची, अहमदाबाद, कोलकाता, लखनऊ, गुवाहाटी, रांची, सुरत, जयपूर आणि जोधपूर या शहरांचा समावेश आहे.

याशिवाय BMW ग्रुप इंडियाच्या नेटवर्कच्या मदतीने MINI ला 36 शहरांमध्ये 51 सर्व्हिस टचपॉइंट्सचे पाठबळ मिळते. त्यामुळे नवीन MINI कार खरेदी करणाऱ्या कस्टमर्सना विक्रीनंतरच्या सर्व्हिससाठीही नेटवर्कचा फायदा घेता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: MINI Cooper SE ची भारतात बुकिंग सुरू झाली आहे का?

    Ans: होय, MINI India ने नवीन इलेक्ट्रिक Cooper SE साठी देशभरातील डीलरशिपमध्ये प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे.

  • Que: MINI Paul Smith Edition कोणत्या मॉडेल्समध्ये मिळणार आहे?

    Ans: ही खास एडिशन MINI Cooper S, MINI Convertible आणि MINI Cooper SE अशा 3 मॉडेल्समध्ये सादर केली जाणार आहे.

  • Que: MINI Paul Smith Edition मध्ये किती रंग मिळणार आहेत?

    Ans: या एडिशनमध्ये Statement Grey, Inspired White आणि Midnight Black Metallic असे 3 रंगांचे ऑप्शन मिळणार आहेत.

Web Title: Mini cooper se paul smith edition india bookings auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री
1

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री

शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारा हार्वेस्टर! महिंद्राचा 50HP Harvest Yuva  लाँच, कापणीचा खर्च वाचवण्यासाठी नवी मशीन
2

शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारा हार्वेस्टर! महिंद्राचा 50HP Harvest Yuva  लाँच, कापणीचा खर्च वाचवण्यासाठी नवी मशीन

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर
3

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

JSW Motors ची ऑफीशियल वेबसाइट सुरू! 4 डिसेंबरला पहिली SUV लाँच होणार
4

JSW Motors ची ऑफीशियल वेबसाइट सुरू! 4 डिसेंबरला पहिली SUV लाँच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.