
VinFast VF5 Facelift Electric SUV India Launch (फोटो सौजन्य-AI एआय)
व्हिएतनामची इलेक्ट्रिक कार कंपनी व्हिनफास्टने आपली लोकप्रिय VF5 फेसलिफ्ट जागतिक स्तरावर सादर केली आहे. ही नवीन व्हिनफास्ट VF5 इलेक्ट्रिक SUV लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये सादर झालेल्या या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरला आता नवीन डिझाइन, अपडेटेड केबिन आणि जास्त कॅपसिटीची बॅटरी मिळाली आहे. भारतात टेस्टिंगदरम्यान ही कार अनेकदा दिसली असून तिच्या डिझाइनचे पेटंटही समोर आले आहे.
बॉक्सी डिझाइनमुळे SUV लूकमध्ये बदल
नवीन व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्टच्या बाह्य डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ही कार आता जास्त उंच आणि बॉक्सी दिसते. तिची लांबी 3,987 मिमी, रुंदी 1,772 मिमी आणि उंची 1,595 मिमी आहे. म्हणजेच जुन्या मॉडेलपेक्षा ती 20 मिमी लांब, 49 मिमी रुंद आणि 16 मिमी उंच झाली आहे. व्हीलबेस 2,514 मिमी कायम राहण्याची शक्यता आहे.
कारच्या पुढील बाजूला क्रोम फिनिश असलेली पट्टी, बंपरवर बसवलेले हेडलॅम्प आणि उभ्या आकाराचे एअर इन्टेक देण्यात आले आहेत. बाजूला 17-इंच एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स आणि बॉडी क्लॅडिंग मिळते. मागच्या बाजूला संपूर्ण रुंदीमध्ये पसरलेली LED लाइट बार, मोठा रूफ स्पॉयलर आणि आकर्षक बंपर डिझाइन आहे.
केबिनमध्ये मोठी स्क्रीन, डॅशबोर्डही नवीन
इंटिरियरमध्येही व्हिनफास्टने बदल केले आहेत. जुन्या मॉडेलमधील तिरक्या डॅशबोर्डऐवजी आता साधी आणि सपाट रचना देण्यात आली आहे. सेंटर टचस्क्रीनचा आकार 8 इंचांवरून 10 इंच करण्यात आला आहे. स्वतंत्र डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले काढून त्याची माहिती टचस्क्रीनमध्येच समाविष्ट केली आहे.
स्टीअरिंग व्हीलला नवीन 2-स्पोक डिझाइन मिळाले आहे. सेंटर कन्सोलवरील रोटरी गिअर सिलेक्टरऐवजी आता स्टीअरिंगमागील उजव्या बाजूच्या स्टॉकद्वारे ड्राइव्ह मोड निवडता येतो. वायरलेस चार्जिंग पॅड, कपहोल्डर्स, स्लाइडिंग आर्मरेस्ट आणि ड्युअल-टोन लेदरेट सीट्सही मिळतात.
43kWh बॅटरी, 370Km रेंज
या इलेक्ट्रिक कारमध्ये 43kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जुन्या मॉडेलमधील 29.6kWh आणि 37.23kWh बॅटरीच्या तुलनेत हा मोठा बदल आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार NEDC सायकलनुसार एका चार्जमध्ये 370Km अंतर धावू शकते.
कारमध्ये पुढील बाजूला बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 99hp पॉवर आणि 135Nm टॉर्क देते. चार्जिंगसाठी 6.6kW AC आणि 60kW DC सपोर्ट मिळतो. भारतात लाँच झाल्यानंतर व्हिनफास्ट VF5 ची टक्कर टाटा नेक्सॉन EV सारख्या इलेक्ट्रिक SUV सोबत होऊ शकते. पण कंपनीने भारतीय मॉडेलची किंमत आणि लाँचची तारीख जाहीर केलेली नाही.
Ans: ही इलेक्ट्रिक SUV भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. पण कंपनीने भारतीय लाँचची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
Ans: कंपनीच्या दाव्यानुसार, 43kWh बॅटरी पॅक असलेली ही कार NEDC टेस्टिंग सायकलनुसार एका चार्जमध्ये 370Km अंतर पार करू शकते.
Ans: या कारमध्ये 10-इंच टचस्क्रीन, 17-इंच अलॉय व्हील्स, वायरलेस चार्जिंग, 2-स्पोक स्टीअरिंग व्हील आणि ड्युअल-टोन लेदरेट सीट्स मिळतात.