
Maruti Brezza 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत मारुतीच्या सगळ्या गाड्यांचं मिळून पेंडिंग बुकिंग 2 लाखांच्या पार गेलं आहे. आणि यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो एकट्या ब्रेझाचा. एकट्या ब्रेझाचं बुकिंग 95 हजारांवर पोहोचलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे.
लोकांना ब्रेझामध्ये सगळ्यात जास्त CNG आणि टर्बो पेट्रोल मॉडेल आवडतंय आहे. बुकिंगचा डेटा पाहिला तर 40 टक्के लोकांनी CNG मॉडेल बुक केलं आहे. तर 38 टक्के लोकांनी टर्बो पेट्रोल व्हेरियंट घेतला आहे. आणि फक्त 22 टक्के लोकांनी 1.5 लिटरचं साधं पेट्रोल इंजिन घेतलं आहे.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांना आता मायलेज जास्त देणारी आणि पॉवरफुल गाडी हवी आहे. CNG मुळे पेट्रोलचा खर्च वाचतो आणि टर्बो इंजिनमुळे गाडीला जोरदार पिकअप मिळतो. म्हणून लोक याच दोन व्हेरियंटकडे जास्त जात आहेत.
सप्टेंबर महिन्यातच ब्रेझाच्या 15 हजारांपेक्षा जास्त गाड्या विकल्या गेल्या आहेत. एवढी मागणी वाढली आहे की कंपनीला गाड्या पुरवणं कठीण झालं आहे. म्हणून मारुतीने एक मोठा निर्णय घेतला आहे.कंपनीने आपलं मासिक उत्पादन वाढवलं आहे. आधी दर महिन्याला 50 हजार गाड्या बनत होत्या, आता त्या 56 हजार गाड्या बनवणार आहेत. जेणेकरून ग्राहकांना गाडीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.
ब्रेझा घेण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तिचं मायलेज आणि किंमत आहे. कंपनी सांगते की ब्रेझा CNG एका किलोमध्ये 26.9 किलोमीटर धावते. हे मायलेज खूपच जबरदस्त आहे. आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 20.47 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतं. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर नवी ब्रेझा खूप परवडणारी आहे. तिची सुरुवातीची किंमत फक्त 7.5 लाख रुपये आहे. आणि टॉप मॉडेलची किंमत 13.70 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.
टाटा सिएरा डार्क रेंज लाँच, १३.९९ लाखांपासून मिळणार दमदार ब्लॅक लूक; जाणून घ्या सविस्तर
या किमतीत एवढे फीचर्स आणि एवढं मायलेज दुसरी कोणतीच SUV देत नाही.फक्त ब्रेझाच नाही तर मारुतीने नुकतीच लॉन्च केलेली बलेनो फेसलिफ्ट पण जोरात विकली जात आहे. पहिल्याच महिन्यात तिच्या 25 हजार गाड्या विकल्या गेल्या आहेत.एकंदरीत पाहिलं तर मारुतीने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की भारतीय ग्राहकांना काय हवं आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. कमी किंमत, जास्त मायलेज आणि भरपूर फीचर्स, यामुळेच ब्रेझा आज सगळ्यांची लाडकी बनली आहे.