फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आहे, ज्या बेस्ट कार ऑफर करत आहे. यातीलच एक बेस्ट ऑटो कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. मारुतीने देशात ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार, अनेक चांगल्या आणि बजेट फ्रेंडली कारसोबत हाय परफॉर्मन्स कार देखील आणल्या आहेत. यातीलच एक कार म्हणजे Maruti Grand Vitara. जर तुम्ही सुद्धा ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.
MG Astor चा ‘हा’ व्हेरियंट भारतीय मार्केटमधून गायब, कंपनीने थांबवली विक्री
मारुती सुझुकीच्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कारपैकी एक म्हणजे मारुती ग्रँड विटारा. ही स्मार्ट हायब्रिड फीचर्ससह येते, ज्यामुळे ही कार प्रति लिटर 20.58 ते 27.97 किमी मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख ते 20.09 लाख रुपयांपर्यंत आहे. आज आपण जाणून घेऊया की तुम्ही मारुती ग्रँड विटाराचा टॉप व्हेरियंट EMI वर कसा खरेदी करू शकता. पण त्याआधी याच्या टॉप व्हेरियंटची किंमत जाणून घेणे सुद्धा महत्वाचे आहे.
मारुती ग्रँड विटारा भारतीय बाजारात १६ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचा टॉप व्हेरियंट अल्फा प्लस हायब्रिड सीव्हीटी (पेट्रोल) आहे. राजधानी दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत 19,99,000 रुपये आहे. त्याच वेळी, त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 23.05 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचा टॉप व्हेरिएंट, अल्फा प्लस हायब्रिड सीव्हीटी (पेट्रोल) खरेदी करणार असाल आणि त्यासाठी तुम्ही ४ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला १९,०५,२१३ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज तुम्हाला बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने दिले जाते, त्यानंतर तुम्हाला या कारसाठी दरमहा ३०,६५३ रुपयांचा ईएमआय म्हणजेच हप्ता जमा करावा लागेल.
FASTag चा वार्षिक पास घेऊ की सतत रिचार्ज करत बसू, काय आहे फायदेशीर?
मारुती ग्रँड विटाराचा टॉप व्हेरियंट खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 19,05,213 रुपयांचे कार कर्ज मिळते. अशा प्रकारे, तुम्हाला दरमहा 30,653 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला दरवर्षी या कारसाठी एकूण 6,69,649 रुपये म्हणून व्याजदर द्यावे लागेल. अशाप्रकारे, मारुती ग्रँड विटारा अल्फा प्लस हायब्रिड सीव्हीटी (पेट्रोल) ची किंमत 25,74,862 रुपये होईल.
ग्रँड विटारा ही मारुती सुझुकी मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये येते. या सेगमेंटमध्ये, ही कार टाटा हॅरियर, टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, एमजी हेक्टर सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.