
फोटो सौजन्य: Pinterest
Maruti Suzuki ही देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी. या कंपनीच्या अनेक कार बाजारात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Baleno. जर तुम्ही ही प्रीमियम हॅचबॅक कार खरेदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात, या कारसाठी जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल?
भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत
मारुतीने बलेनोचा बेस व्हेरिएंट म्हणून सिग्मा सादर केली आहे. कंपनी या प्रीमियम हॅचबॅकचा बेस व्हेरिएंट म्हणून 5.99 लाख या एक्स-शोरूम किमतीत विकते. जर ही खरेदी केली गेली तर 5.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत रजिस्ट्रेशन आणि विमा शुल्क समाविष्ट असेल. या कारसाठी अंदाजे 24000 रुपयांच्या रजिस्ट्रेशन टॅक्स आणि अंदाजे 35000 रुपयांचे विमा शुल्क आकारले जाईल. या कारची ऑन-रोड किंमत 6.58 लाख रुपये आहे.
जर तुम्ही Maruti Baleno चा बेस व्हेरिएंट Sigma खरेदी करत असाल, तर बँकेकडून कारची एक्स-शोरूम किंमत गृहीत धरूनच कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 4.58 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागेल. जर बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 4.58 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा सुमारे 7,363 रुपयांचा EMI भरावा लागेल.
30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये
9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.57 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, दरमहा 7,363 रुपयांचा EMI सात वर्षे भरावी लागेल. या कालावधीत तुम्हाला सुमारे 1.60 लाख रुपये केवळ व्याजाच्या स्वरूपात भरावे लागतील. परिणामी, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून पाहिले तर Maruti Baleno च्या बेस व्हेरिएंट Sigma ची एकूण किंमत सुमारे 8.18 लाख रुपयांपर्यंत जाईल.