फोटो सौजन्य: Pinterest
Maruti Suzuki ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी. कंपनी नेहमीच ‘ग्राहकांना काय हवे आहे?’ याचा विचार करत मार्केटमध्ये उत्तोमोत्तम कार ऑफर करत असते. अशीच एक 2025 ची Best Selling Car म्हणजे Maruti Suzuki Baleno.
डिसेंबर 2025 मध्ये मारुती सुझुकी बलेनोने मोठा विक्रम प्रस्थापित केला होता. बलेनोचे 22,108 युनिट्स विकले गेल्याने ती देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. विक्रीत या कारने Tata Nexon, Maruti Dzire और Mahindra Scorpio ला मागे टाकले. बलेनो हे यश तिची परवडणारी किंमत, प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेजमुळे गाठले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकी बलेनोची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होत 9.10 लाखांपर्यंत जाते. ही कार Sigma, Delta, Zeta आणि Alpha सारख्या अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार योग्य व्हेरिएंट निवडता येतो.
Maruti Suzuki Baleno मध्ये 1.2-लीटर K-Series Dual Jet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे 90 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल तसेच AMT (ऑटोमॅटिक) गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असून, शहरात आणि महामार्गावर दोन्ही ठिकाणी संतुलित परफॉर्मन्स देतो. याशिवाय, किफायतशीर ड्रायव्हिंगसाठी CNG वेरिएंटचाही पर्याय देण्यात आला आहे.
Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी
मायलेजच्या बाबतीतही Maruti Suzuki Baleno मजबूत ठरते. याचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट सुमारे 22.35 kmpl, AMT व्हेरिएंट अंदाजे 22.94 kmpl तर CNG वेरिएंट 30.61 kmpl पर्यंत मायलेज देतो. त्यामुळे ही कार दैनंदिन वापरासाठी किफायतशीर पर्याय ठरते.
Baleno मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 9-इंच SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि की-लेस एंट्री यांचा समावेश आहे. हे फीचर्स तरुण ग्राहकांसोबतच कुटुंबांसाठीही ही कार आकर्षक बनवतात.






