फोटो सौजन्य: iStock
सणासुदीचा काळ हा एक असा काळ असतो ज्याची प्रत्येक सामान्य नागरिक आणि विविध ब्रँड्स आतुरतेने वाट पाहत असतात. याच काळात अनेक जण आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. त्यातही कित्येक जण नवीन कार्स विकत घेताना दिसतात. जर तुम्ही सुद्धा यंदा कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या पुढील कार्सवर बम्पर डिस्काउंट देत आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या कार्सवर किती डिस्काउंट मिळत आहे.
मारुती ब्रेझा वर कोणतीही अधिकृत सूट नाही, परंतु काही डीलर्स त्यावर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. मारुती ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख ते 14.14 लाख रुपये आहे.
हे देखील वाचा: SUV घ्यायचा विचार करताय? Jeep देत आहे या कार्सवर भन्नाट डिस्काउंट, आजच करा बुक
XL6 वर एकूण 35 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस दोन्ही समाविष्ट आहेत. हे पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हर्जनमध्ये येते. मारुती सुझुकी XL6 ची एक्स-शोरूम किंमत रु. 11.61 लाख ते रु. 14.77 लाख आहे.
स्विफ्टवर एकूण 35 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. या कारमध्ये नवीन Z-सीरीज इंजिन आणि अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. मारुती सुझुकी स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.59 लाख रुपये आहे.
Ciaz वर 40 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी सी-सेगमेंट सेडान आहे, तरीही तिच्या विक्रीत घट झाली आहे. मारुती सुझुकी सियाझची एक्स-शोरूम किंमत 9.40 लाख ते 12.29 लाख रुपये आहे.
या फेस्टिव्ह सीझनमध्ये डिझायरवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या सवलतीमध्ये एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. या कारची चौथी जनरेशन 4 नोव्हेंबर रोजी लाँच होत आहे. मारुती सुझुकी डिझायरची किंमत 6.57 लाख ते 9.34 लाख रुपये आहे.
यंदाच्या सणासुदीच्या काळात WagonR वर 45 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात आवडत्या बजेट कारपैकी एक आहे. मारुती वॅगन आरची किंमत 5.54 लाख ते 7.21 लाख रुपये आहे.
या फेस्टिव्ह सीझनमध्ये बलेनोवर 47 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही भारतातील लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक कार्सपैकी एक आहे. मारुती बलेनोची किंमत 6.66 लाख ते 9.83 लाख रुपये आहे.