फोटो सौजन्य: iStock
सध्या देशभरात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे आता सणासुदीचा काळ चालू झाला आहे. याच काळात अनेक जण आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी नवीन गोष्टी खरेदी करत असतात. तसेच कित्येक जण नवीन कार किंवा बाईक आपल्या घरी आणत असतात. अशावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्सवर विशेष सवलत देत असतात.
जर तुम्ही सुद्धा एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे जीप कंपनी पुढील दमदार कार्सवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे.
हे देखील वाचा: आजच जाणून घ्या स्टेअरिंग पकडण्याची योग्य पद्धत, अपघाताची शक्यात होईल खूपच कमी
जीपने भारतीय बाजारपेठेत जीप ग्रँड चेरोकी नावाची कार ऑफर केली आहे ,ज्यामध्ये अतिशय शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स आहेत. सणासुदीच्या काळात कंपनी या कारवर सर्वाधिक सूट देत आहे. जीपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही कार ऑक्टोबर 2024 मध्ये खरेदी केल्यास 12 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
जीपने ऑक्टोबर 2024 मध्ये तिच्या SUV Meridian वर लाखो रुपये वाचवण्याची संधी देखील दिली आहे. या महिन्यात कंपनीकडून ही SUV खरेदी करून तुम्ही 3.15 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. याशिवाय कॉर्पोरेट ऑफर्स आणि स्पेशल ऑफर्सही ग्राहकांना देण्यात येत आहेत.
हे देखील वाचा: कारचा वेग कमी करताना क्लच दाबणे गरजेचे आहे का? प्रत्येक कार चालकाने जाणून घ्या
जीपने एंट्री मॉडेल म्हणून कंपास ऑफर केले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये ही SUV खरेदी करून तुम्ही लाखो रुपये वाचवू शकतात. कंपनी जीप कंपासवर कमाल 2.80 लाख रुपयांची सूट देत आहे.
जर कोणाकडे जीप कंपनीची एसयूव्ही असेल तर त्यांना सुद्धा कंपनीकडून 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत बचत करण्याची संधी दिली जाणार आहे.
माहितीनुसार, लेबर चार्जेस आणि काही भागांवर 10 टक्के सवलत, कार केअर ट्रीटमेंटवर 15 टक्के आणि निवडक ॲक्सेसरीजवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.