Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ऑरम एडिशन लाँच; 22,990 रुपयांत मिळणार खास अॅक्सेसरीज आणि कॉपर लूक

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ऑरम एडिशन सादर करण्यात आले आहे. 22,990 रुपयांच्या अॅक्सेसरी किटमध्ये कॉपर इन्सर्ट्स, क्रोम गार्निश आणि केबिनसाठी खास अॅक्सेसरीज मिळतात. पण या स्पेशल एडिशनमध्ये इंजिन बदलले आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 25, 2026 | 03:47 PM
मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ऑरम एडिशन लाँच; 22,990 रुपयांत मिळणार खास अॅक्सेसरीज आणि कॉपर लूक
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीने व्हिक्टोरिसच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ऑरम एडिशन सादर केले असून अॅक्सेसरी किटची किंमत 22,990 रुपये आहे.
  • या एडिशनमध्ये कॉपर इन्सर्ट्स, क्रोम गार्निश, 3D फ्लोअर मॅट्स आणि ट्रंक सिल गार्ड यांसारख्या खास अॅक्सेसरीज मिळतात.
  • ऑरम एडिशन फक्त स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून इंजिन किंवा परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय व्हिक्टोरिस एसयूव्हीच्या भारतातील पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ऑरम एडिशन सादर केले आहे. या स्पेशल एडिशनमध्ये बाहेरील लूक आणि केबिनमध्ये काही खास बदल करण्यात आले आहेत. या एडिशनसाठी अॅक्सेसरी किटची किंमत 22,990 रुपये आहे. हे किट फक्त स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटसाठी अव्हेलेबल आहे. कंपनीने या एडिशनमध्ये इंजिन किंवा परफॉर्मन्समध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

बाहेरील लूकला मिळाला कॉपर टच

व्हिक्टोरिस ऑरम एडिशनमध्ये कॉपर रंगाचे इन्सर्ट्स हे मुख्य आकर्षण आहे. फ्रंट, साइड आणि रिअर स्किड प्लेट्स तसेच व्हील आर्चेसवर हे इन्सर्ट्स देण्यात आले आहेत. याशिवाय फ्रंट ग्रिल, फेंडर्स, बंपर्स, बॉडी-साइड मोल्डिंग्स आणि डोअर व्हायझर्सवर क्रोम गार्निश देण्यात आले आहे. या बदलांमुळे एसयूव्हीच्या बाहेरील लूकला वेगळी ओळख मिळते. ‘ऑरम’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ सोने असा होतो.

मारुती सुझुकी ऑल्टो आणि एस-प्रेसोच्या किमती वाढवणार नाही; बजेट कार खरेदीदारांना दिलासा

केबिनमध्येही खास अॅक्सेसरीज

या स्पेशल एडिशनच्या केबिनमध्ये ऑल-वेदर 3D फ्लोअर मॅट्स, 3D बूट मॅट आणि रिअर ट्रंक सिल गार्ड देण्यात आले आहेत. हे बदल प्रामुख्याने गाडीचे सेफ्टी आणि वापरातील सोयी लक्षात घेऊन करण्यात आले आहेत. अभिनेता शाहिद कपूरला या एडिशनच्या जाहिरात campaign साठी निवडण्यात आले आहे.

विक्रीचा विक्रम आणि इंजिनचे ऑप्शन्स

मारुती सुझुकीच्या दाव्यानुसार, व्हिक्टोरिसने लाँचनंतर भारतात 1 लाख आणि 1.5 लाख युनिट्सच्या एकत्रित विक्रीचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. या यशाच्या पार्श्वभूमीवर ऑरम एडिशन सादर करण्यात आले आहे.

व्हिक्टोरिसमध्ये 1.5-लिटर पेट्रोल, पेट्रोल-सीएनजी आणि 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड असे पॉवरट्रेन ऑप्शन्स मिळतात. पेट्रोल इंजिन 103.06 PS पॉवर आणि 139 Nm टॉर्क देते. सीएनजी व्हेरिएंटमध्ये पेट्रोल मोडमध्ये 100.6 PS पॉवर, तर सीएनजी मोडमध्ये 87.8 PS पॉवर मिळते. स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचे कॉम्बिनेशन आहे. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि e-CVT असे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे ऑरम एडिशनमध्ये लूकला प्राधान्य देणाऱ्या कस्टमर्सना हायब्रिड टेक्नोलॉजीसह खास स्टाइल मिळणार आहे.

मारुती सुझुकीने भारतात विकल्या 65 लाखांहून जास्त जुन्या कार! ‘ट्रू व्हॅल्यू’ स्कीमचा जंगी विक्रम!

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ऑरम एडिशनची किंमत किती आहे?
उत्तर: ऑरम एडिशनच्या अॅक्सेसरी किटची किंमत 22,990 रुपये आहे. ही किंमत संपूर्ण गाडीची किंमत नसून स्पेशल अॅक्सेसरी किटसाठी आहे.

प्रश्न 2: व्हिक्टोरिस ऑरम एडिशन कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळते?
उत्तर: हे स्पेशल एडिशन फक्त व्हिक्टोरिसच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल आहे.

प्रश्न 3: ऑरम एडिशनमध्ये इंजिन किंवा परफॉर्मन्समध्ये बदल करण्यात आले आहेत का?
उत्तर: नाही. या एडिशनमध्ये इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. यात प्रामुख्याने बाहेरील कॉपर इन्सर्ट्स, क्रोम गार्निश आणि केबिन अॅक्सेसरीज देण्यात आल्या आहेत.

Web Title: Maruti suzuki victoris aurum edition launched with special accessories auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स
1

टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय
2

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय

SUV विक्रीत टाटा पंचचा डंका! नेक्सॉन आणि फ्रॉन्क्सला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक
3

SUV विक्रीत टाटा पंचचा डंका! नेक्सॉन आणि फ्रॉन्क्सला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

इव्हेकोसाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! शेअरहोल्डर्सचा विरोध, तरीही ऑफरची किंमत वाढवणार नाही
4

इव्हेकोसाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! शेअरहोल्डर्सचा विरोध, तरीही ऑफरची किंमत वाढवणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.