Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स

टेस्ला मॉडेल Y आता फक्त 19,990 रुपये महिन्याला मिळू शकते, असा कंपनीचा दावा आहे. पण प्रत्यक्ष ईएमआय 39,990 रुपयांपासून सुरू होतो! मग 20,000 रुपयांची बचत कशी मोजली आहे? जाणून घ्या या खास स्कीममागचं गणित आणि कस्टमर्सना मिळणारे फायदे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 25, 2026 | 02:47 PM
टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स
Follow Us
Follow Us:
  • टेस्ला मॉडेल Y साठी 6 लाख रुपये डाउन पेमेंट आणि 39,990 रुपयांपासून ईएमआय सुरू होतो.
  • कंपनीच्या काऊटिंगनुसार फ्युल आणि मेंटेनन्समधील अंदाजित बचत दरमहा 20,000 रुपये आहे.
  • कार्निव्हल मध्ये एक्सचेंज व्हॅल्युएशन, फायनान्स सुविधा आणि प्रत्येक खरेदीवर वॉल कनेक्टर मिळणार आहे.
इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टेस्लाने भारतीय कस्टमर्ससाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने 23 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान भारतात ‘स्विच अँड सेव्ह कार्निव्हल’ आयोजित केला आहे. या 3 दिवसांच्या कार्यक्रमात टेस्ला मॉडेल Y ची प्रभावी मासिक मालकी किंमत 19,990 रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण ही रक्कम प्रत्यक्ष ईएमआय नसून फ्युल आणि मेंटेनन्समधील अंदाजित बचत वजा केल्यानंतर समोर आलेला आकडा आहे.

प्रत्यक्ष ईएमआय किती भरावा लागेल?

या स्कीमअंतर्गत कस्टमर्सना 6 लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. त्यानंतर 7 वर्षांच्या स्टेप-अप ईएमआय प्लॅनमध्ये 8.5% वार्षिक व्याजदराने मासिक हप्ता 39,990 रुपयांपासून सुरू होतो. टेस्लाच्या गणनेनुसार पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत दर महिन्याला अंदाजे 20,000 रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे कंपनी प्रभावी मासिक खर्च 19,990 रुपये असल्याचे सांगते. पण प्रत्यक्ष ईएमआय हा बँकेच्या मंजुरीनुसार आणि कर्जाच्या अटींनुसार बदलू शकतो.

टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स

बचतीचं गणित कसं मांडलं आहे?

टेस्लाने ही बचत मोजताना मॉडेल Y चा वीज वापर 100 किमी प्रवासासाठी 14.3 kWh आणि विजेचा दर प्रति युनिट 7 रुपये गृहीत धरला आहे. तुलनेसाठी पेट्रोल किंवा डिझेल कारचे मायलेज 8 किमी प्रति लिटर आणि सर्व्हिसिंगचा खर्च 2 रुपये प्रति किमी मानला आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन ऑइल, स्पार्क प्लग आणि मल्टिस्पीड ट्रान्समिशनच्या सर्व्हिसिंगची गरज नसते. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे ब्रेक पॅडचा झीजदरही कमी होऊ शकतो. त्यामुळे नियमित मेंटेनन्सचा खर्च कमी होण्यास मदत मिळते.

कार्निव्हलमध्ये आणखी काय मिळणार?

या कार्यक्रमात कस्टमर्सना टेस्ला मॉडेल Y आणि 6-सीटर मॉडेल Y L पाहता येईल. जुन्या कारचे एक्सचेंज व्हॅल्युएशन आणि टेस्लाच्या फायनान्स पार्टनर्सकडून कर्जाची प्रक्रिया करण्याची सुविधाही मिळणार आहे. या काळात खरेदी केलेल्या प्रत्येक कारसोबत टेस्ला वॉल कनेक्टर दिला जाणार आहे.

हा कार्यक्रम नोएडा, दिल्ली, गुरुग्राम, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई येथील टेस्ला सेंटर्समध्ये सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत आयोजित केला आहे. 2026 मॉडेल Y प्रीमियम रिअर-व्हील ड्राइव्ह आणि मॉडेल Y L साठी टेस्ट ड्राइव्ह बुक करता येईल. त्यामुळे कार खरेदीपूर्वी तिचा अनुभव घेण्याची संधी कस्टमर्सना मिळणार आहे.

टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: टेस्ला मॉडेल Y ची मासिक किंमत 19,990 रुपये आहे का?
उत्तर: नाही. हा प्रत्यक्ष ईएमआय नाही. कंपनीने अंदाजित इंधन आणि मेंटेनन्स बचत वजा केल्यानंतर ही प्रभावी मासिक मालकी किंमत मांडली आहे. प्रत्यक्ष ईएमआय 39,990 रुपयांपासून सुरू होतो.

प्रश्न 2: टेस्ला मॉडेल Y खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
उत्तर: या स्कीममध्ये 6 लाख रुपये डाउन पेमेंट आवश्यक आहे. फायनान्स मंजुरी आणि अंतिम हप्त्याची रक्कम कर्ज देणाऱ्या संस्थेच्या अटींवर अवलंबून असेल.

प्रश्न 3: टेस्लाच्या कार्निव्हलमध्ये कोणते फायदे मिळणार आहेत?
उत्तर: कस्टमर्सना एक्सचेंज व्हॅल्युएशन, फायनान्सची सुविधा, मॉडेल Y आणि मॉडेल Y L पाहण्याची संधी तसेच कार खरेदी केल्यावर टेस्ला वॉल कनेक्टर मिळणार आहे.

Web Title: Tesla model y monthly emi scheme india october 2026 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • automobile
  • emi
  • Tesla

संबंधित बातम्या

SUV विक्रीत टाटा पंचचा डंका! नेक्सॉन आणि फ्रॉन्क्सला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक
1

SUV विक्रीत टाटा पंचचा डंका! नेक्सॉन आणि फ्रॉन्क्सला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

इव्हेकोसाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! शेअरहोल्डर्सचा विरोध, तरीही ऑफरची किंमत वाढवणार नाही
2

इव्हेकोसाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! शेअरहोल्डर्सचा विरोध, तरीही ऑफरची किंमत वाढवणार नाही

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी
3

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी

2030 पासून नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग कंपल्सरी होणार? सरकारचा मोठा प्रस्ताव! जाणून घ्या सविस्तरपणे
4

2030 पासून नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग कंपल्सरी होणार? सरकारचा मोठा प्रस्ताव! जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.