GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन!
पूर्वी कार खरेदी करताना आपल्याला 28 टक्के जीएसटी देणे अनिवार्य होते. मात्र, केंद्र सरकारने जीएसटीत सुधारणा केली आणि थेट 28 टक्क्यांचा टॅक्स 18 टक्क्यांवर आणला. यामुळे कार खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळेच GST कमी झाल्यानंतर भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे. आता मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. लहान आणि किफायतशीर कार्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. सप्टेंबर 2025 च्या सेल्स रिपोर्टमध्ये ग्राहकांचा कल स्पष्ट दिसून येतो.
सप्टेंबर 2025 मध्ये Maruti Suzuki पुन्हा एकदा टॉपवर राहिली आहे. कंपनीने एकूण 1,89,665 युनिट्स विक्री केली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने 1,84,727 युनिट्स विकल्या होत्या. म्हणजेच या वेळी वार्षिक आधारावर 2.67% वाढ नोंदली गेली आहे. यावरूनच समजून येते की Maruti आजही ग्राहकांची पहिली पसंती आहे.
Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…
Tata Motors ने यावेळी विक्रीत मोठी झेप घेतली आहे. कंपनीने सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 59,667 युनिट्स विकल्या, तर सप्टेंबर 2024 मध्ये हा आकडा फक्त 41,063 युनिट्स होता. म्हणजेच Tata Motors च्या विक्रीत वार्षिक आधारावर 45.31% वाढ झाली आहे. हे कंपनीसाठी एक मोठे यश मानले जाते.
Mahindra ने आपल्या SUV रेंज च्या जोरावर मजबूत विक्री केली. सप्टेंबर 2025 मध्ये कंपनीने 56,233 युनिट्स विकल्या. मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा 51,062 युनिट्स होता. म्हणजेच Mahindra च्या विक्रीत वार्षिक आधारावर 10% वाढ झाली आहे.
Hyundai सप्टेंबर 2025 मध्ये चौथ्या स्थानावर राहिली. कंपनीने एकूण 51,547 युनिट्स विकल्या. हा आकडा सप्टेंबर 2024 मधील 51,101 युनिट्स च्या तुलनेत फक्त 0.87% वाढ दर्शवतो. वाढ सामान्य जरी असली तरी Hyundai ने आपली जागा कायम टॉप 5 मध्ये कायम राखली आहे.
Toyota नेही सप्टेंबर 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. कंपनीने एकूण 27,089 युनिट्स विकल्या, जे सप्टेंबर 2024 मधील 23,802 युनिट्स पेक्षा 13.82% जास्त आहे. या शानदार वाढमुळे Toyota ने टॉप-5 मध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.