'या' दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला
भारतीय बाजारात बाईकच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात GST कमी झाल्याने तर ऑटो इंडस्ट्री आणि बाईक खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे कारण ज्या बाईक खरेदी करताना 28 टक्के GST भरावा लागत होता. आज त्याच बाईकवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यामुळेच तर सप्टेंबरमध्ये बाईक्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
भारतीय टू-व्हीलर मार्केटसाठी सप्टेंबर 2025 खास ठरला आहे. या महिन्यात एकूण 20 लाखांहून अधिक बाईक्स आणि स्कूटर्स विकल्या गेल्या असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 9% जास्त आहे. नवरात्रीसह फेस्टिव्हल ऑफर्स सुरू होताच ग्राहकांच्या खरेदीत मोठी वाढ झाली. डीलरशिपवर ग्राहकांची गर्दी वाढली आणि कम्युटर बाईक सेगमेंटमध्ये तर मागणी दुप्पट झाली. त्यामुळे ग्राहकांना आता आधीपेक्षा कमी किंमतीत त्यांच्या आवडीच्या बाईक किंवा स्कूटर खरेदी करता येत आहेत.
सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
सप्टेंबर 2025 हा रॉयल एनफील्डसाठी महत्वाचा महिना ठरला आहे. कारण या महिन्यात कंपनीची विक्री 43% ने वाढून 1,13,000 युनिट्सपर्यंत पोहोचली आहे, जी आतापर्यंतची त्यांची सर्वाधिक मासिक विक्री आहे. सीईओ बी. गोविंदराजन यांनी सांगितले की, रॉयल एनफील्डने एका महिन्यात एक लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकल्याची ही पहिलीच वेळ आहे. Classic, Bullet आणि Hunter सारख्या मॉडेल्सनी या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
टीव्हीएस मोटरने देखील चांगली कामगिरी दाखवली. सप्टेंबरमध्ये विक्री 12% ने वाढून 4,13,000 युनिट्स झाली. विशेषतः Jupiter स्कूटर आणि iQube इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात चांगली कामगिरी केली. शिवाय, कंपनीच्या निर्याती आणि ईव्ही सेगमेंट्सनेही वाढीला हातभार लावला.
Bajaj Auto ने सप्टेंबरमध्ये 2,73,000 युनिट्स विकल्या, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त आहे. बजाजची मजबूत पकड आता फक्त भारतापुरती मर्यादित नाही, तर अफ्रिका आणि लॅटिन अमेरिका सारख्या ग्लोबल मार्केट्समध्येही दिसून येत आहे.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?
Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ची विक्री सप्टेंबरमध्ये 5,05,000 युनिट्स राहिली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 3% हलकी वाढ आहे. कंपनीचे सर्वात मजबूत सेगमेंट अजूनही स्कूटर मार्केट आहे, जिथे Honda Activa ग्राहकांची पहिली पसंती बनलेली आहे.
नवरात्रीदरम्यान टू-व्हीलर्सच्या मागणीत वाढ पाहायला मिळाली, पण या वेळी कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर्स कमी दिल्या. सामान्यतः 5,000 ते 10,000 रुपये पर्यंत सूट मिळते, पण या वेळी अनेक मॉडेल्सवर ऑफर मर्यादित होत्या. शिवाय, जोरदार मान्सूनमुळे ग्रामीण भागातील विक्री थोडी मंदावली.