फोटो सौजन्य: Social Media
भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी जोर धरू लागली आहे. आता प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार उत्पादित करण्याकडे जास्त लक्ष देत आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीमुळे अनेक कार खरेदीदार इलेक्ट्रिक कार्स खरेदी करण्याकडे आपला कल दाखवत आहे. यावरून एक गोष्ट नमूद होते ती म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील आगामी काळ हा इलेक्ट्रिक कार्सचा असणार आहे.
मारुती सुझुकी ही भारतातील कार उत्पादित करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे, जी नेहमीच ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कार्स मार्केटमध्ये लाँच करत असते. कंपनीच्या अनेक कार्स या भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. आता कंपनी इलेक्ट्रिक सेजमेण्टमध्ये सुद्धा आपले पाहिलं पाऊल टाकण्यास सज्ज होत आहे. अहवालानुसार, Maruti eVX च फायनल प्रोडक्शन स्पेक व्हर्जन येत्या 4 नोव्हेंबर रोजी मिलान इटली येथे गोलाबल डेब्यू करेल. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
हे देखील वाचा: ऑटोमॅटिक मोडमध्ये धावणार यामाहाची ‘ही’ नवीन बाईक, लूक आणि पॉवर आहे दमदार
मारुती eVX इलेक्ट्रिक कार पहिल्यांदा 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. यानंतर टोकियो येथे आयोजित जपान मोबिलिटी शोमध्ये eVX चे प्रदर्शन करण्यात आले. आता ही इलेक्ट्रिक कार नोव्हेंबर 2024 मध्ये मिलान, इटली येथे जागतिक स्तरावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
मारुतीच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये शार्प एलईडी हेडलाइट्स आणि टेल लाईट्स आहेत. याशिवाय eVX मध्ये स्पोर्टी अलॉय व्हीलचा नवीन सेट दिला जाऊ शकतो. त्याचे इंटिरिअर आणि फीचर्सही आकर्षक असणार आहे.
मारुती eVX मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेदरेट सीट, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पॅनोरामिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासह अनेक लक्झरी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
ADAS सुरक्षा: मारुती सुझुकी eVX उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससह लाँच केली जाईल. यामध्ये 6 एअरबॅग दिल्या जाऊ शकतात. याशिवाय, टॉप एंड व्हेरियंटमध्ये लेव्हल-2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान देखील प्रदान केले जाऊ शकते.
हे देखील वाचा: Kawasaki च्या ‘या’ बाईकमध्ये होणार महत्वाचा बदल, लेटेस्ट फीचरसह भारत होईल आगमन
रिपोर्ट्सनुसार, Maruti eVX ला 60 kWh Li-ion बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, जो 500KM ची रेंज देईल. टेस्टिंग स्पाय स्पॉटमध्ये दोन-स्पोक स्टेअरिंग व्हील आणि ड्युअल-स्क्रीन लेआउट दिसत आहे.
मारुती eVX सुमारे 15 लाख रुपयात लाँच केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत ही इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV, MG Windsor EV, Tata Curve EV आणि Mahindra XUV400 सारख्या ईव्हीशी स्पर्धा करेल.