फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक अशा ऑटो कंपनीज आहेत ज्या गाहकांसाठी बजेट फ्रेंडली बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. पण काही अशा कंपनीज सुद्धा आहेत ज्या त्यांच्या हाय परफॉर्मन्स आणि महागड्या बाईक्ससाठी ओळखल्या जातात. या काही कंपनीज मधील एक कंपनी म्हणजे कावासाकी.
कावासाकीची बाईक घेणे अनेक जणांचे स्वप्न असते. आजही या कंपनीची बाईक रस्त्यावरून जाताना दिसली की अनेक जण त्या बाईककडे टक लावून बघत असतात. आता कंपनी आपली एक बाईक अपडेट करणार आहे.
कावासाकी आपल्या लोकप्रिय बाईक Z900 मध्ये एक मोठे अपडेट करणार आहे. ही बाईक नवीन स्टाइल आणि अनेक उत्तम फीचर्ससह भारतीय बाजारात आणली जाणार आहे. यासोबतच Z900 SE च्या टॉप-एंड व्हेरियंटमध्येही अनेक मोठे बदल केले जाऊ शकतात. बाईकच्या स्क्रीनपासून त्याची पॉवरही पाहण्यासारखी असणार आहे. ही बाईक पुढच्या वर्षी 2025 मध्ये अनेक अपडेट्ससह बाजारात येईल.
हे देखील वाचा: Tata Nexon की Curvv, कोणत्या कारवर सरकार लावत आहे जास्त टॅक्स? जाणून घ्या
कावासाकी बाईक शक्तिशाली इंजिन आणि महागड्या किमतींसाठी ओळखल्या जातात. Z900 मध्ये अपडेटसह या बाईकची किंमत काय असेल याबद्दल जाणून घेऊया.
नवीन कावासाकी Z900 नवीन स्टाइलसह बाजारात आणली जाईल, जी पूर्वीपेक्षा अधिक झुकावने चालविली जाऊ शकते. Z500 आणि Z7 हायब्रीड बाईक्सप्रमाणे या बाईकमध्ये हेडलॅम्प बसवले जातील. या बाईकमध्ये नवीन टेललाइट बसवण्यात येणार आहे. बाईकला लाईट्स आणि झेड लोगोसह नवीन फ्रेश लूक सुद्धा दिला जाणार आहे.
2025 Kawasaki Z900 मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक फीचर्स देखील जोडली जातील, कारण आता या बाईकमध्ये राइड-बाय-वायर आणि IMU (इंटर्नल मेजरमेंट युनिट) देखील जोडले जात आहेत. या बाईकवर इलेक्ट्रॉनिक राईडमध्ये दोन पॉवर मोड असतील – फुल्ल आणि लो. कावासाकी या पॉवरफुल बाईकमध्ये तीन लेव्हलचे ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देखील देत आहे, ज्यामध्ये टर्न ऑफचे वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे. यासोबतच नवीन Kawasaki Z900 मध्ये बाय डायरेक्शनल क्विक शिफ्टर, क्रूझ कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल ABS ची सुविधा देखील दिली जाईल.
या कावासाकी बाईकमध्ये उपलब्ध असलेले सर्वात मोठा फिचर म्हणजे याला व्हॉईस कमांडद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते. बाईकमध्ये बसवलेल्या 5-इंचाच्या TFT डिस्प्लेवर रायडरसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध असेल. हा डिस्प्ले स्मार्टफोन किंवा हेडसेटलाही जोडता येतो.
भारतात Kawasaki Z900 ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 9.38 लाख रुपये आहे. अनेक अपडेट्ससह, या बाईकच्या किंमतीत बदल देखील दिसू शकतात. 2025 साली लाँच होणारी ही बाईक सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत थोडी महाग असू शकते.