फोटो सौजन्य: Social Media
दिवाळीच सण संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. या शुभमुहूर्तावर अनेक जण नवीन कार आणि बाईक विकत घेत असतात. म्हणूनच अनेक ऑटो कंपनीज या काळात आपल्या वाहनांवर आकर्षित डिस्कॉउंट्स आणि कॅशबॅक ऑफर करत असतात. तर काही कंपनीज नवीन बाईक किंवा कार लाँच करत असतात. नुकतेच यामाहा या दुचाकी उत्पादक कंपनीने आपली नवीन अपडेटेड बाईक सादर केली आहे.
यामाहाने नवीन MT-07 चे अनावरण केले आहे. ही यामाहाची चौथ्या जनरेशनची मॉडेल बाईक आहे, जी अनेक अपग्रेड्ससह येणार आहे. या बाईकमध्ये नवीन इंजिन बसवण्यात आले आहे. अनेक नवीन फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत. यामाहाने या बाईकला नवा लूक दिला आहे. ही नवीन बाईकMT-09 चे अपग्रेड व्हर्जन आहे. या बाईकमध्ये नवीन Y-AMT सेमी-ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देखील देण्यात आला आहे. ही बाईक लाँच करताना तिची किंमत कळणार आहे.
हे देखील वाचा: Tata Nexon की Curvv, कोणत्या कारवर सरकार लावत आहे जास्त टॅक्स? जाणून घ्या
Yamaha MT-07 नवीन ट्यूबलर स्टील चेसिसने बनलेले आहे. या बाईकमध्ये एलईडी डीआरएलसह दोन eyebrows बनवल्या आहेत, त्यासोबत प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प देखील लावले आहेत. या डिझाइनमुळे बाईकला स्टायलिश लूक देण्यात आला आहे. यामध्ये लाइटवेट स्पिन-फोर्ज्ड 17-इंच अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे या बाईकचे वजन सुमारे एक किलोग्रॅमने कमी झाले आहे. या बाईकचे एकूण वजन सुमारे 183 किलो आहे. बाईकमधील हँडलबार पूर्वीपेक्षा अधिक ब्रॉड करण्यात आला आहे.
यामाहाने आपली बाईक आणखी पॉवरफुल बनवली आहे. या बाईकमध्ये CP2 698cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड मोटर आहे. या बाईकमध्ये रिवाइज्ड एअरबॉक्स, नवीन इनटेक फनेल आणि फ्युएल टँकच्या वर पोर्ट बसवण्यात आले आहेत. या बाईकमध्ये लावलेली मोटर 72.4 bhp ची पॉवर प्रदान करते.
हे देखील वाचा: ‘ही’ आहे भारतात विकली जाणारी सर्वात महागडी बाईक, किंमत Fortuner Innova पेक्षा जास्त
यामाहाने वाय-एएमटी सेमी-ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह बाईकला अजून अपडेट केले आहे. या ट्रान्समिशनमधून क्लच आणि गिअर शिफ्टर काढण्यात आले आहेत. त्याऐवजी, मॅन्युअल शिफ्ट गिअरसाठी स्विचगिअरमध्ये वर आणि खाली शिफ्ट बटणे इन्स्टॉल केली गेली आहेत. ही बाईक दोन ऑटोमॅटिक मोडमध्ये चालवली जाऊ शकते, ज्यामध्ये रायडरला गिअर्स शिफ्ट करताना कोणतेही इनपुट देण्याची गरज नाही.