फोटो सौजन्य: https://www.mgmotor.co.in
आज अनेक कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाकडे विशेष लक्षकेंद्रित करताना दिसत आहे. कार खरेदीदार सुद्धा या इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद देत आहे. त्याचप्रमाणे आता अनेक ऑटो कंपन्या, फुल्ल चार्जिंगमध्ये जास्तीत जास्त रेंज कसे देता येईल, यावर काम करत आहे.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या बेस्ट इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. बाजारात आधीच ईव्ही सेगमेंटमध्ये Punch आणि Nexon ऑफर करणाऱ्या टाटा मोटर्सला JSW MG मोटर्ससोबत चांगली स्पर्धा करावी लागत आहे. MG Windsor EV ही इलेक्ट्रिक कार गेल्या काही महिन्यापासून ग्राहकांची आवडती कार बनली आहे. चला जाणून घेऊया, गेल्या चार महिन्यांत देशभरात एमजीच्या विंडसर ईव्हीच्या किती युनिट्स विकले गेले आहेत. तसेच हे देखील जाणून घेऊयात की एमजीच्या तुलनेत दोन्ही टाटा ईव्हीची मागणी किती आहे.
New Generation Creta मार्केटमध्ये राडा करणार, कधी होणार लाँच? चला जाणून घेऊया
एमजीने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये विंडसर ईव्ही आणली आहे. ही कार लाँच झाल्यापासून भारतात खूप लोकप्रिय ठरली आहे. आकडेवारीनुसार, 2024 च्या शेवटच्या तिमाहीत आणि जानेवारी 2025 मध्ये या कारच्या 13 हजारांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. कंपनीने ऑक्टोबर 2024 मध्ये 3116 युनिट्स, नोव्हेंबर 2024 मध्ये 3144 युनिट्स, डिसेंबर 2024 मध्ये 3785 युनिट्स आणि जानेवारी 2025 मध्ये 3450 युनिट्स विकल्या.
टाटा पंच ईव्ही ही टाटा मोटर्सने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून आणली आहे. आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये टाटा पंच ईव्हीच्या 915 युनिट्स, नोव्हेंबर 2024 मध्ये 926 युनिट्स, डिसेंबर 2024 मध्ये 1653 युनिट्स, जानेवारी 2025 मध्ये 1189 युनिट्स विकल्या गेल्या.
‘ही’ 7 सीटर कार मार्केटमध्ये ठरतेय सुपरहिट, किंमत एकदा जाणून घ्याच
टाटाची पंच ही सब फॉर मीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये या कारच्या 1593 युनिट्स विकल्या गेल्या. नोव्हेंबर 2024 मध्ये 1899 युनिट्स, डिसेंबर 2024 मध्ये 1603 युनिट्स आणि जानेवारी 2025 मध्ये 1289 लोकांनी ते खरेदी केले.
भारतीय बाजारपेठेत JSW MG Windsor EV दोन स्वरूपात उपलब्ध आहे. कंपनीकडून BaaS (Battery As A Service) सोबतची ही कार 9.99 लाख रुपयांना ऑफर केली जात आहे. याशिवाय, जर कार बॅटरीसह खरेदी केली असेल तर त्याची एक्स-शोरूम किंमत 14 लाख ते 16 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
त्याच वेळी, टाटा पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याचे टॉप व्हेरियंट 14.44 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही 12.49 लाख ते 16.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.