फोटो सौजन्य: @mi_battri(X.com)
भारतीय मार्केटमध्ये नेहमीच ग्राहक बजेट फ्रेंडली कार्सना प्राधान्य देत असतात. ग्राहकांची हीच मागणी पाहून, अनेक ऑटो कंपन्या देशात उत्तम फीचर्स असणाऱ्या बजेट फ्रेंडली कार ऑफर करत असतात. देशात मारुती सुझुकी अनेक वर्षांपासून उत्तम कार्स लाँच करत आहे. आज आपण कंपनीच्या अशाच एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, जी उत्तम मायलेज तर देतेच. पण यासोबतच तिची किंत देखील कमी आहे.
मारुती सुझुकीची मिनी हॅचबॅक S-Presso सध्या ऑटो मार्केटमध्ये खूप चर्चेत आहे. या कारची आकर्षक डिझाइन, परवडणारी किंमत आणि जबरदस्त मायलेज यामुळे ती आर्थिक वर्ष 2025 च्या सर्वाधिक पसंतीच्या स्वस्त कारच्या यादीत आली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान 23,538 ग्राहकांनी ही कार खरेदी केली आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती कमी किमतीतही उत्तम फीचर्स देते व शहरी आणि ग्रामीण रस्त्यांसाठी सर्वोत्तम मानली जाते.
अवजड वाहनांसह ई-रिक्षाच्या सेफ्टीबाबत Nitin Gadkari यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
भारतीय बाजारात एस-प्रेसोची किंमत 4.26 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, जी त्याच्या STD बेस व्हेरियंटची किंमत आहे. त्याच वेळी, त्याचा टॉप व्हेरियंट VXI CNG 6.12 लाख रुपयांपर्यंत जातो. सीएनजी मॉडेलची सुरुवातीची किंमत 5.91 लाख रुपये आहे. ही हॅचबॅक 8 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्यामुळे खरेदीदार त्यांच्या गरजेनुसार उत्तम पर्याय निवडू शकतात.
Maruti S-Presso ही एक उंच बॉय स्टाईल कार आहे, जी 180 मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह येते. यात 14-इंचाचे व्हील्स मिळतात, ज्यामुळे ती खराब रस्त्यांवरही सहज धावते.
ही उंच-बॉय स्टॅन्स हॅचबॅक 8 व्हेरियंटमध्ये येते, ज्यामध्ये बेस मॉडेल STD आणि टॉप व्हेरियंट VXI CNG समाविष्ट आहे. यात 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 68 पीएस पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे, तर सीएनजी व्हर्जन फक्त मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येते. मारुती एस-प्रेसो पेट्रोल व्हेरियंटमध्ये 24.12 ते 25.30 किमी प्रति लिटर आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये 32.73 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देण्याचा दावा करते.
ही हॅचबॅक 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल क्लस्टर, ड्युअल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर, हिल होल्ड असिस्ट आणि एबीएस+ईबीडी सारख्या फीचर्ससह येते. कमी बजेटमध्ये चांगले मायलेज आणि फीचर्स हव्या असलेल्यांसाठी मारुती एस-प्रेसो हा एक विश्वासार्ह पर्याय बनला आहे.