फोटो सौजन्य; @_rlane_(X.com)
भारतात अनेक उत्तम कार्स उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकाच्या मागणी आणि आवडीनुसार बेस्ट कार्स ऑफर करत असतात. या कंपन्यांमध्ये अनेक विदेशी ऑटो कंपन्यांचा देखील समावेश आहे, ज्यात ह्युंदाईचे नाव अग्रस्थानी आहे.
ह्युंदाईने भारतीय बाजारात अनेक बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या कार्स ऑफर केल्या आहेत. वेळोवेळी कंपनीने आपल्या कार्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन फीचर्स समाविष्ट करत बदल घडवले आहेत. मात्र, कंपनीच्या एका लोकप्रिय कारच्या विक्रीत अलीकडे मोठी घट झाली आहे. विक्रीत घट असूनही, ह्युंदाई ही कार बंद न करता तिचे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हे फेसलिफ्ट मॉडेल नव्या डिझाइन, अपग्रेडेड फीचर्स आणि अधिक चांगल्या परफॉर्मन्ससह येण्याची शक्यता आहे. कंपनीचा उद्देश ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि या सेगमेंटमध्ये पुन्हा मजबूत स्थान निर्माण करणे हा आहे.
Hero, KTM आणि Royal Enfield टेन्शनमध्ये ! येत्या 15 तारखेला लाँच होणार ‘ही’ पॉवरफुल बाईक
Ioniq 5 ही Hyundai Motor India च्या पोर्टफोलिओमधील एक लक्झरी इलेक्ट्रिक SUV आहे. ही कार कंपनीने तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. परंतु, भारतीय बाजारात या इलेक्ट्रिक SUV ची विक्री ढासळली आहे.
मार्चमध्ये Ioniq 5 च्या फक्त 19 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. इतकेच नाही तर गेल्या 6 महिन्यांत या कारला कोणत्याही महिन्यात 25 ग्राहक देखील मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत, आता कंपनी भारतीय बाजारात तिचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याची प्लॅनींग करत आहे.
Ioniq 5 Facelift मार्च 2024 पासून देशाबाहेर जागतिक बाजारात विकली जात आहे. आता भारतात त्याची टेस्टिंग सुरू झाली आहे. अशी अपेक्षा आहे की त्यात अनेक कॉस्मेटिक बदलांसह 84 kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळू शकेल.
Tata Harrier चा बेस व्हेरियंट 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केले तर किती असेल EMI?
Hyundai Ioniq 5 फेसलिफ्टच्या स्पाय इमेजेसमध्ये नवीन डिझाइन केलेल्या पाच-स्पोक अलॉय व्हील्स दिसून येत आहे. तसेच व्हिज्युअल अपडेट्स पुढील आणि मागील बाजूस देखील उपलब्ध असतील. काही हायलाइट्समध्ये नवीन डिझाइन केलेले बंपर आणि पॉलिश केलेले V-आकाराचे गार्निश असणार आहेत. त्याची एकूण लांबी 4,655 मिमी पर्यंत वाढते, जी पूर्वीपेक्षा 20 मिमी जास्त आहे. परंतु, ते त्याची मूळ रुंदी 1,890 मिमी, उंची 1,605 मिमी आणि व्हीलबेस 3,000 मिमी राखते.