अवजड वाहनांसह ई-रिक्षाच्या सेफ्टीबाबत Nitin Gadkari यांनी केली 'ही' मोठी घोषणा
भारतात ज्याप्रमाणे वाहनांच्या संख्येत भर होताना दिसत आहे, त्याचप्रमाणे रस्त्यांवर त्यांची वर्दळ देखील वाढत आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. याच अपघातांच्या घटना कमी व्हाव्यात म्हणून केंद्र सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अनेक प्रयत्न करत असतात.
दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो आणि हजारो लोक जखमी होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या बाबतीत खूप गंभीर आहेत. 24 एप्रिल 2025 रोजी रस्ते वाहतूक शिक्षण संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी काय म्हटले आहे. त्याबाद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Bajaj Pulsar खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी ! ‘या’ तीन मॉडेलवर मिळतेय भरघोस सूट
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही भारतात सातत्याने चांगले रस्ते बांधत आहोत, ज्यामध्ये एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. परंतु त्याच वेळी रस्ते सुरक्षेवरही काम करण्याची गरज आहे. जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. दरवर्षी देशात 4.8 लाख अपघात होतात, ज्यामध्ये 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. देशातील 18 ते 45 वयोगटातील लोकांमध्ये अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू होतात. हे कमी करण्यासाठी, आमचे उद्दिष्ट भारतात सुरक्षित, स्मार्ट आणि सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट साध्य करणे आहे.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघात कमी करण्याच्या ध्येयात आयआरटीई मदत करत आहे. देशात रस्ते सुरक्षेवर बरेच काम केले जात आहे. भारतात, आम्ही 2023 मध्ये एनसीएपी सुरू केले, त्यानंतर प्रवासी वाहनांची सुरक्षितता सुधारली आहे. आता जगातील सर्वोत्तम वाहने भारतात तयार केली जात आहेत. लवकरच अशाच कार्यक्रमात ई-रिक्षा आणि जड वाहनांचाही समावेश केला जाईल. ई-रिक्षा आणि जड वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच नवीन मानके तयार केली जातील. हे BNCAP च्या धर्तीवर असतील.
Hero, KTM आणि Royal Enfield टेन्शनमध्ये ! येत्या 15 तारखेला लाँच होणार ‘ही’ पॉवरफुल बाईक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातानंतर जखमींना त्वरित उपचार देण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, गोल्डन आवर (अपघातानंतरचा पहिला तास) मध्ये उपचाराअभावी अपघातांमध्ये 30% लोकांचा मृत्यू होतो. लोकांना याबद्दल जागरूक केले जात आहे आणि जखमींना रुग्णालयात नेणाऱ्यांना पूर्वी 5000 रुपये बक्षीस म्हणून दिले जात होते, जे आता 25000 रुपये केले जात आहे. यासोबतच, त्यांनी जखमींना जास्तीत जास्त सात दिवस आणि 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्याबाबतही बोलले.