Tata Motors कडून Tata Ace Pro लाँच
भारतीय मार्केटमध्ये कमर्शियल वाहनांची आघाडीची उत्पादक कंपनी टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करते. कंपनीने अलीकडेच Tata Ace Pro बाजारात आणली आहे. केवळ 3.99 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत उपलब्ध असलेला टाटा एस प्रो देशातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी ट्रक ठरला आहे. उत्तम कार्यक्षमता, बहुपर्यायी वापरासारख्या फीचर्समुळे टाटा एस प्रो ग्राहकांसाठी आदर्श पर्याय ठरतो.
पेट्रोल, बाय-फ्युएल (सीएनजी+पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक अशा तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा ट्रक लहान व्यावसायिक आणि स्टार्टअप्ससाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहक देशभरातील टाटा मोटर्सच्या 1250 टचपॉइंट्स किंवा ऑनलाइन ‘Fleet Edge’ प्लॅटफॉर्मवरून एस प्रो बुक करू शकतात. टाटा मोटर्सने आघाडीच्या बँक व एनबीएफसींसोबत भागीदारी करून उत्तम फायनान्स सुविधा व त्वरित कर्ज मंजुरीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, “मागील दोन दशकांमध्ये टाटा एसने 25 लाखांहून अधिक उद्योजकांना सक्षम केले. टाटा एस प्रोद्वारे आम्ही हा वारसा पुढे नेत आहोत. हे वाहन स्थिरता, सुरक्षितता आणि नफ्याच्या दृष्टीने नव्या यशाची नांदी आहे.”
भारतातील अनेक शहरांमध्ये Vinfast च्या कार शोकेस, लवकरच मिळणार आकर्षक कारची डिलिव्हरी
एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष पिनाकी हलदर म्हणाले, “टाटा एस प्रो हा विविध हवामान, भूप्रदेश आणि वापराच्या गरजांसाठी सखोल चाचण्या करून विकसित केला गेलेला मॉडेल आहे. महाराष्ट्रात सीएनजी आणि इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ घेणारे वापरकर्ते या व्हेरिएंटसाठी उत्तम पात्र आहेत.”
पेलोड क्षमता: 750 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आणि 6.5 फूट डेकसह विविध उपयोजनांसाठी सुसंगत.
केबिन डिझाइन: कार-सारखी आरामदायी केबिन, डिजिटल डिस्प्ले, इन्फोटेनमेंट पर्याय आणि क्रॅश टेस्टेड संरचना.
कनेक्टिव्हिटी: Fleet Edge सिस्टममुळे वाहन आरोग्य, चालकाची वागणूक आणि मेंटेनन्सवर रिअल-टाइम नियंत्रण.
सर्व्हिस नेटवर्क: देशभरात 2500+ सर्व्हिस सेंटर आणि 24×7 रोडसाइड असिस्टन्स.
फक्त 50,000 रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये हातात येईल Tata Nexon ची चावी, ‘असा’ EMI चा सोपा हिशोब
कंपनीने या ट्रकमध्ये 694 सीसी इंजिन दिले आहे. जे 30 बीएचपी पॉवर आणि 55 न्यूटन मीटर टॉर्क देते. दुसरीकडे, इलेक्ट्रिक व्हर्जन 38 बीएचपी पॉवर आणि 104 न्यूटन मीटर टॉर्क देते. एका चार्जमध्ये हा ट्रक 155 किमी पर्यंत चालवता येते. सीएनजी पर्यायात अतिरिक्त पाच लिटर पेट्रोल टँक आहे आणि सीएनजी इंजिनसह ते 26 बीएचपी पॉवर आणि 51 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.