Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Exter च्या Facelift व्हर्जनची तयारी सुरु, लाँच होण्याअगोदरच मिळाली ‘ही’ माहिती

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे ह्युंदाई एक्स्टर. माहितीनुसार, या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 05:43 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  1. ह्युंदाई मोटर्स ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी
  2. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Exter ला चांगली मागणी
  3. लवकरच फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होण्याची शक्यता
भारतीय ऑटो बाजरात कॉम्पॅक्ट SUV वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक कार उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार आणत आहे. मात्र, काही कार अशा देखील आहेत. ज्या या सेगमेंटमध्ये आधीच लोकप्रिय ठरल्यात. यातीलच एक कार म्हणजे Hyundai Exter.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Hyundai ने भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही, ह्युंदाई एक्स्टरचे फेसलिफ्ट व्हर्जन आणायची तयारी करत आहे. कंपनीने जरी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली, ही एसयूव्ही अलीकडेच टेस्टिंग करताना स्पॉट झाली आहे.

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

कोणती माहिती मिळाली?

रिपोर्टनुसार, ही एसयूव्ही पुन्हा दक्षिण कोरियामध्ये टेस्टिंग करताना दिसली आहे. या काळात ती पूर्णपणे लपवण्यात आली होती. मात्र, काही वैशिष्ट्ये अजूनही उपलब्ध आहेत. फेसलिफ्टमध्ये सध्याच्या व्हर्जनप्रमाणेच हेडलाइट्स, ग्रिल आणि टेललाईट्स असण्याची अपेक्षा आहे. टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या युनिटमध्ये स्टील व्हील्स बसवण्यात आल्या होत्या, जे बेस व्हेरिएंटमध्ये देऊ शकतात. मात्र, बंपरमध्ये काही बदल केले जाऊ शकतात.

हे फीचर्स असतील उपलब्ध

Hyundai च्या नवीन डिझाइनमुळे एसयूव्हीच्या इंटिरिअरमध्ये देखील बदल होऊ शकतात. अनेक नवीन फीचर्स देखील यात जोडले जाऊ शकतात. 360-डिग्री कॅमेरा, एक मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम, एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, आर्मरेस्ट आणि मागील सनशेड सारखी फीचर्स दिली जाऊ शकतात.

कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती

इंजिन किती शक्तिशाली असेल?

अहवालांनुसार, एसयूव्हीचे इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या कारमध्ये विद्यमान 1.2-लिटर इंजिन असण्याची अपेक्षा आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113.8 एनएम टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्याय देखील दिले जाऊ शकतात. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांसह ऑफर केली जाईल.

कधी होणार लाँच?

कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या SUV चा फेसलिफ्ट व्हर्जन भारतात 2026 च्या अखेरीस सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फेसलिफ्टसह या मॉडेलच्या किमतीतही किरकोळ वाढ होऊ शकते.

कोणाशी आहे स्पर्धा?

Hyundai Exter ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये ही कार थेट स्पर्धा Tata Punch आणि Maruti Wagon R सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी होते.

Web Title: Hyundai exter facelift may launch soon testing is started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV

संबंधित बातम्या

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या
1

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?
2

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा
3

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
4

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.