Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबो, 1 लिटर इंधनावर 45 किमीचा मायलेज! जगातील सर्वात जास्त मायलेज देणारी Hybrid Car आली

चीनची लोकप्रिय ऑटो कंपनी Geely Auto ने नवीन हायब्रीड टेक्नॉलॉजी असणारी कार आणली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या i-HEV AI टेक्नॉलॉजीने वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 15, 2026 | 04:32 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • आली सर्वात जास्त मायलेज देणारी हायब्रीड कार
  • Geely या ऑटो कंपनीच्या i-HEV AI टेक्नॉलॉजीने कमाल
  • जाणून घ्या या विशेष कारबद्दल
चीन नेहमीच त्यांच्या विशेष टेक्नॉलॉजीमुळे चर्चेत असतात. म्हणूनच तर त्यांच्या येथील ऑटो कंपन्या मार्केटमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी असणाऱ्या कार्स आणत असतात. सध्या अशाच एका कारची चर्चा रंगली आहे.

Geely Auto, या एका प्रसिद्ध चीनी वाहन निर्मात्याने, i-HEV नावाचे एक नवीन हायब्रीड तंत्रज्ञान सादर केले आहे, जे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे चालते. महामार्गावरील चाचणीदरम्यान, या टेक्नॉलॉजीने उल्लेखनीय परिणाम साधले; 100 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या टेक्नॉलॉजीने केवळ 2.22 लिटर इंधन वापरले. याचा अर्थ, याची इंधन कार्यक्षमता प्रति लिटर 45 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या कामगिरीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अधिकृतपणे मान्यता देऊन नोंद करण्यात आली आहे.

कार खरेदीदारांनो लागा तयारीला! New Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात, कोणता मॉडेल सर्वात आधी मिळणार?

हे तंत्रज्ञान कसे काम करते?

गीलीची नवीन टेक्नॉलॉजी मूलतः एका बुद्धिमान संगणकाप्रमाणे कार्य करते, जो वाहनाच्या ऊर्जेचे व्यवस्थापन करतो. कार धावत असताना, ही टेक्नॉलॉजी सभोवतालचे तापमान, आर्द्रता आणि रस्त्याची उंची यांसारख्या बाह्य घटकांवर सतत लक्ष ठेवते. या माहितीच्या आधारे, अंतर्गत ज्वलन इंजिन केव्हा सुरू करायचे आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर केव्हा करायचा, हे ती आपोआप ठरवते.

काय आहे याचा फायदा?

या टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंजिन नेहमी आपल्या सर्वोत्तम क्षमतेने काम करते. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेलचा वापर खूप कमी होतो आणि मायलेज लक्षणीय वाढते. कंपनीच्या मते, AI क्लाउड पॉवर तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही जगातील पहिली हायब्रिड प्रणाली आहे.

कारचे वैशिष्ट्ये आणि फीचर्स

या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून त्याला पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरची जोड आहे. इंजिनची रचना अशी करण्यात आली आहे की इंधनाचा प्रत्येक थेंब पूर्णपणे उपयोगात येतो. ही मोटर इतकी ताकदवान आहे की कार 0 ते 30 किमी/ताशी वेग फक्त 1.84 सेकंदात गाठते. याशिवाय, ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा वाया न जाता ती पुन्हा विद्युत ऊर्जेत रूपांतरित करून बॅटरी चार्ज केली जाते.

Volkswagen ची नवी Taigun Facelift लाँच; कार खरेदीवर मिळत आहे ‘ही’ बेस्ट ऑफर

जपानी कंपन्यांना टक्कर

Geely कंपनीचे हे नवीन तंत्रज्ञान हायब्रिड कार मार्केटमध्ये Toyota सारख्या मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. टोयोटा या क्षेत्रात दीर्घकाळ आघाडीवर असली तरी Geely चे हे तंत्रज्ञान अधिक चांगले मायलेज आणि स्मार्ट ड्रायव्हिंग फीचर्स देत आहे.

सर्वात मोठी खासियत काय?

या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा AI आधारित “मेंदू”. ही सिस्टीम कारची ड्रायव्हिंग, आतील फीचर्स आणि चेसिस एकाच ठिकाणाहून नियंत्रित करतो. सध्या जपानी कार्समध्ये या स्तराची स्मार्ट टेक्नॉलॉजी कमी प्रमाणात पाहायला मिळते, ज्यामुळे ही कार अधिक बुद्धिमान आणि प्रगत बनते.

Web Title: Most mileage giving hybrid car geely auto i hev ai hybrid technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Auto
  • China
  • Hybrid
  • new car

संबंधित बातम्या

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
1

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं
2

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?
3

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश
4

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.