Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China : शी जिनपिंगनंतर जनरल झांग शेंगमिन चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती; सोपवण्यात आल्या 3 मोठ्या जबाबदाऱ्या

China : २०२५ मध्ये झांग शेंगमिन यांची चिनी लष्कराचे उप-कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्यांचा पॉलिटब्युरोमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे शिस्तपालन विभागाची जबाबदारी होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 30, 2026 | 02:54 PM
Zhang Shengmin China Military Xi Jinping Successor General Zhang

Zhang Shengmin China Military Xi Jinping Successor General Zhang

Follow Us
Follow Us:
  • झांग शेंगमिन यांची पॉलिटब्युरोवर नियुक्ती
  • सर्वात शक्तिशाली जनरल
  • भ्रष्टाचार निर्मूलन कारवाई

जागतिक राजकारणात आणि विशेषतः चीनच्या (China) राजकीय वर्तुळात सध्या एकाच नावांची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जनरल झांग शेंगमिन. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशातील सर्व प्रस्थापित परंपरा आणि नियमांना बाजूला सारत लष्कराचे उप-कमांडर झांग शेंगमिन यांची थेट कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्था असलेल्या ‘पॉलिटब्युरो’वर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्यांची निवड सामान्यतः पक्ष अधिवेशनात केली जाते. पुढील अधिवेशन २०२७ मध्ये होणार असतानाही, शी जिनपिंग यांनी ही प्रतीक्षा न करता शेंगमिन यांना थेट ही मोठी जबाबदारी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शी जिनपिंग यांच्यानंतर झांग शेंगमिन हे चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत.

सध्याच्या घडीला शेंगमिन हे चीनमधील एकमेव अशा जनरल आहेत, ज्यांच्याकडे उपराष्ट्रपतीपदाचा दर्जा असून ते थेट पॉलिटब्युरोचे सदस्यही आहेत. गेल्या वर्षभरात चिनी सैन्यातील उच्चपदस्थ जनरल्सवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सातपैकी पाच जनरल्सना पदावरून हटवण्यात आले आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि उलथापालथीच्या काळात झांग शेंगमिन यांच्याकडे चीनच्या लष्करी आणि राजकीय यंत्रणेची कमान सोपवण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय विश्लेषकही अवाक झाले आहेत.

 कोण आहेत झांग शेंगमिन आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला?

फेब्रुवारी १९५८ मध्ये शांक्सी प्रांतात जन्मलेले झांग शेंगमिन वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी चिनी सैन्यात दाखल झाले. सुरुवातीला अत्यंत सामान्य सैनिकाच्या रूपात काम करणाऱ्या शेंगमिन यांचे नशीब २०१० मध्ये पालटले. २०१० मध्ये आलेल्या एका भीषण भूकंपाच्या वेळी त्यांनी भूकंपाचे निवारण करणाऱ्या विशेष पथकाचे यशस्वी नेतृत्व केले होते. या कामगिरीमुळे ते वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या नजरेत आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tsar Bomba : जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब फुटला; 900 किमी दूर फुटल्या काचा, पृथ्वी तीन वेळा हादरली

२०१३ मध्ये शी जिनपिंग चीनच्या सत्तेवर आल्यानंतर, झांग शेंगमिन यांना एकामागोमाग एक मोठ्या जबाबदाऱ्या आणि पटलावर भरघोस बडत्या मिळत गेल्या. शी जिनपिंग यांच्या अतिशय जवळच्या आणि विश्वासू वर्तुळात त्यांची गणना होऊ लागली. चिनी सैन्यामध्ये प्रचंड प्रमाणावर पसरलेला भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढण्यासाठी शी जिनपिंग यांनी झांग यांच्यावर लष्कराच्या शिस्तपालन समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी ही जबाबदारी अतिशय कडक पद्धतीने पार पाडली.

सैन्यातील भ्रष्टाचारावर कडक कारवाई आणि वाढलेला प्रभाव

भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना, झांग शेंगमिन यांनी चिनी सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली. त्यांच्या या धडक कारवाईमुळे सैन्यातील तब्बल सात जनरल्सना आपली नोकरी आणि पदे गमवावी लागली. इतकेच नाही तर, झांग यांच्या या भूमिकेमुळे चिनी सैन्याचे उपाध्यक्ष झांग युशिया यांनाही अडचणींचा सामना करावा लागला आणि आपली नोकरी गमवावी लागली. या संपूर्ण कारवाईवरून शेंगमिन यांची शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासक म्हणून ओळख निर्माण झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics: ‘रशियाविरोधात बोलू नका’, अमेरिकेचा बाल्टिक देशांना संयम बाळगण्याचा सल्ला, नेमके काय घडले?

यावर्षी त्यांची चीनच्या १९व्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली होती. सध्या ६७ वर्षांचे असलेले झांग हे चिनी सैन्यात सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. चिनी सैन्याच्या संरचनेनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख असतात, त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा क्रमांक लागतो. सहसा या पदावर दोन व्यक्ती असतात, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून झांग हे एकटेच हे पद सांभाळत आहेत. आता त्यांना पॉलिटब्युरोमध्ये स्थान मिळाल्यामुळे त्यांचे प्रशासकीय आणि राजकीय वजन कैक पटीने वाढले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शी जिनपिंग यांनी झांग शेंगमिन यांची कोणती नवीन पदी नियुक्ती केली आहे?

    Ans: शी जिनपिंग यांनी नियमांना शिथिल करत झांग शेंगमिन यांची कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्था असलेल्या 'पॉलिटब्युरो'वर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

  • Que: जनरल झांग शेंगमिन यांची पार्श्वभूमी काय आहे?

    Ans: झांग शेंगमिन यांचा जन्म फेब्रुवारी १९५८ मध्ये झाला असून, २० व्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. त्यांनी सैन्यातील भ्रष्टाचारविरोधी शिस्तपालन समितीचे प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • Que: झांग शेंगमिन यांचा जन्म फेब्रुवारी १९५८ मध्ये झाला असून, २० व्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. त्यांनी सैन्यातील भ्रष्टाचारविरोधी शिस्तपालन समितीचे प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

    Ans: ते सध्या चिनी सैन्यातील एकमेव जनरल आहेत ज्यांच्याकडे उपराष्ट्रपतीचा दर्जा असून, ते पॉलिटब्युरोचे सदस्य आहेत. त्यामुळे शी जिनपिंग यांच्यानंतर ते सर्वात शक्तिशाली व्यक्ती ठरले आहेत.

Web Title: Xi jinping after general zhang shengmin most powerful man china hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • China
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Elon Musk : अमेरिकन युजर्सना मस्कचे प्लॅटफॉर्म का आवडेनासे झाले? सोशल मीडिया मार्केटमध्ये ‘या’ ऍप्सनी मारली बाजी
1

Elon Musk : अमेरिकन युजर्सना मस्कचे प्लॅटफॉर्म का आवडेनासे झाले? सोशल मीडिया मार्केटमध्ये ‘या’ ऍप्सनी मारली बाजी

Tsar Bomba : जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब फुटला; 900 किमी दूर फुटल्या काचा, पृथ्वी तीन वेळा हादरली
2

Tsar Bomba : जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब फुटला; 900 किमी दूर फुटल्या काचा, पृथ्वी तीन वेळा हादरली

US Politics: ‘रशियाविरोधात बोलू नका’, अमेरिकेचा बाल्टिक देशांना संयम बाळगण्याचा सल्ला, नेमके काय घडले?
3

US Politics: ‘रशियाविरोधात बोलू नका’, अमेरिकेचा बाल्टिक देशांना संयम बाळगण्याचा सल्ला, नेमके काय घडले?

Helicopter Crash: अमेरिकेत थरारक अपघात! हवेतच दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली; तीन जणांचा मृत्यू झाल्याने उडाली खळबळ
4

Helicopter Crash: अमेरिकेत थरारक अपघात! हवेतच दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली; तीन जणांचा मृत्यू झाल्याने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.