Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China News :चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव

China News : चीनच्या रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होत असून स्वस्त चिनी रसायनांचा वापर जगभरातील विविध उद्योगांमध्ये वाढत आहे. घरातील रंग, सोफ्यातील फोम, प्लास्टिक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीतही या रसायनांचा वापर होतो. त्यामुळे जागतिक उत्पादन क्षेत्रात चीनचे महत्त्व वाढत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 30, 2026 | 06:21 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • स्वस्त उत्पादनामुळे चीनला फायदा
  • मध्यपूर्वेतील संघर्षाचाही चीनला फायदा
  • जागतिक उद्योगही चीनवर अवलंबून
China News : उपासमारी , गरिबी बघतिलेला चीन आज आपल्या योग्य आणि अथक परिश्रमानंतर आजच्या जगात महत्वाचा देश बनला आहे . चीनने जवळपास सगळ्याच क्षेत्रात जोरदार प्रगती करून महासत्ता होण्याच्या दिशेने आपली पाऊले टाकली आहेत . जागतिक बाजारपेठेत चीनचे वर्चस्व आता केवळ इलेक्ट्रॉनिक्स , मोबाईल आणि तयार वस्तूंपुरते मर्यादित राहिले नाही . रासायनिक उत्पादनाच्या क्षेत्रातही चीनने मोठी प्रगती केलेली आहे .

विशेष म्हणजे चीनमधून निर्यात होणाऱ्या स्वस्त रसायनांचा वापर जगभरातील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या असंख्य वस्तूंच्या निर्मितीत होत आहे . घरातील भिंतींना लावला जाणारा रंग , सोफ्यातील फोम , प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या पिशव्या आणि आंघोळीसाठी वापरले जाणारे शॅम्पू अशा अनेक उत्पादनांमध्ये चिनी रसायनांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे .

स्वस्त उत्पादनामुळे चीनला फायदा

चीनच्या रासायनिक उद्योगाची ताकद त्याच्या मोठ्या उत्पादन क्षमतेत आणि तुलनेने कमी उत्पादन खर्चात आहे . मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेला कच्चा माल , औद्योगिक पायाभूत सुविधा आणि उत्पादनातील स्पर्धात्मक किमती यामुळे चिनी रसायनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी मिळत आहे . चीनचा जागतिक रासायनिक उत्पादनातील वाटा जवळपास निम्मा असल्याचे BASF च्या उद्योग अहवालात नमूद करण्यात आले आहे .

2026ED138 : सूर्यमालेत एका नवीन ग्रह! सूर्याभोवती फिरताना दिसलेली एक रहस्यमय वस्तू; बटु ग्रह असल्याचा दावा

मध्यपूर्वेतील संघर्षाचाही चीनला फायदा

२०२६ मध्ये मध्यपूर्वेतील युद्धामुळे जगातील बऱ्याच देशांना फटका बसलेला आहे . अनेक छोटे मोठे उद्योग चालवणे कठीण होत आहे . यामुळे आशियातील अनेक रासायनिक उत्पादकांना कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे .

मात्र चीनकडे कोळश्यावर आधारित रासायनिक उत्पादनाची मोठी क्षमता आणि कच्च्या तेलाचा साठा असल्याने त्याला तुलनेने फायदा झाला आहे . मार्च २०२६ मध्ये चीनच्या काही रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे . भारतासह अनेक आशियाई देशांसाठी चीन महत्वाचा पुरवठादार बनत आहे .

US Military : 3 पॉलीग्राफ चाचण्यांत नापास! अमेरिकन जनरलची हकालपट्टी, इरान-युक्रेन युद्धाची माहिती लीक केल्याचा आरोप

जागतिक उद्योगही चीनवर अवलंबून

चीनच्या स्वस्त रसायनांमुळे अनेक उद्योगाचा उत्पादन खर्च कमी होतो . मात्र एका देशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्यास पुरवठा खंडित होणे , किमतीमध्ये अचानक बदल होणे आणि व्यापारविषयक निर्बंध यांसारखे धोके निर्माण होऊ शकतात . त्यामुळे विविध देश आपली स्थानिक रासायनिक उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत आहेत . घरातील दैनंदिन वस्तूंपासून मोठ्या औद्योगिक उत्पादनापर्यंतचा चीनचा वाढता प्रभाव जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल अधोरेखित करतो .

Web Title: Url slug china chemical exports global market household products impact cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • chemical
  • China
  • Marathi News

संबंधित बातम्या

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा
1

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
2

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
3

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास
4

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.