फोटो सौजन्य: iStock
लॉजिस्टिक्स क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेली नाशिक गूड्स ट्रान्सपोर्ट ही कंपनी आज महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानसारख्या प्रमुख राज्यांमध्ये एक विश्वासार्ह नाव बनली आहे. वेळेवर सेवा, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारी ही कंपनी सतत प्रगती करत आहे. राजेश कातिरा आणि त्यांचा मुलगा चिराग कातिरा यांच्या नेतृत्वाखालील हा सेकंड-जनरेशन कौटुंबिक व्यवसाय परिवहन क्षेत्रातील बदलत्या गरजांशी जुळवून घेत विकसित होत आहे. गेली दोन दशके टाटा मोटर्ससोबत असलेल्या घट्ट सहकार्यामुळे या यशात मोठा वाटा आहे.
सध्या कंपनीकडे २५० हून अधिक व्यावसायिक वाहनांचा ताफा आहे, ज्यामध्ये बहुसंख्य टाटा मोटर्सच्या इंटरमीजिएट, लाइट आणि मीडियम कमर्शियल वाहनांचा समावेश आहे. हे सर्व ट्रक कार्यक्षमतेसाठी, विश्वासार्हतेसाठी आणि दीर्घकालीन टिकावासाठी खास डिझाइन करण्यात आले आहेत. नाशिक गूड्स ट्रान्सपोर्टने नुकतीच पाच नवीन ट्रकची भर घालून आपला ताफा आणखी मजबूत केला आहे, ज्यामध्ये नविन SFC 610 आणि LPT 1816 यांचा समावेश आहे.
ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी
या भागीदारीबाबत चिराग कातिरा म्हणाले, “विश्वास व भरवसा हे आमच्या व्यवसायाचे आधारस्तंभ आहेत आणि टाटा मोटर्सने आमच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या ट्रकद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना जास्त विश्वासाने सेवा देऊ शकतो. नव्या ट्रकमध्ये सुधारित टॉर्क वितरण, ड्युअल ड्रायव्हिंग मोड्स आणि सुरक्षिततेची वैशिष्ट्ये असून ते उत्तम इंधन कार्यक्षमतेसह टिकाऊपणा आणि विश्वासार्हता देखील देतात. यामुळे आम्हाला विविध मार्गांवर कार्यक्षम सेवा देता येते आणि ग्राहक समाधानात वाढ होते.”*
टाटा मोटर्सही या दीर्घकालीन सहकार्याबद्दल सकारात्मक आहे. कंपनी नाशिक गूड्स ट्रान्सपोर्टसारख्या विश्वसनीय लॉजिस्टिक्स भागीदारांसोबत काम करून देशातील वाहतूक आणि लॉजिस्टिक्स उद्योगाला नव्या उंचीवर नेत आहे. विक्री-पश्चात सेवा, तांत्रिक नाविन्य आणि देशव्यापी डीलर नेटवर्कमुळे टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो.
जबरदस्त ऑफर! यामाहाच्या स्कूटर RayZR 125 Fi हायब्रिडवर १० वर्षांच्या वॉरंटीसह १०,००० रुपयांची सूट
या भागीदारीमुळे नाशिक गूड्स ट्रान्सपोर्ट कंपनी भारतात लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली असून कार्यक्षमतेचे आणि उत्कृष्ट ग्राहक सेवांचे नवीन मानदंड स्थापन करत आहे.