फोटो सौजन्य: @OlaElectric (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. हीच मागणी लक्षात घेत प्रत्येक ऑटो कंपनी दमदार इलेक्ट्रिक बाईक, कार आणि स्कूटर लाँच करतेय, ज्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातही इलेक्ट्रिक दुचाक्यांना चांगली मागणी मिळत आहे. यात Ola Electric अग्रस्थानी आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी म्हंटलं की ओला इलेक्ट्रिकचे नाव डोळ्यांसमोर येते. कंपनी ई स्कूटर ऑफर करण्यासोबतच ई बाईक देखील ऑफर करते. नुकतेच कंपनीने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या कार्यरत प्रोटोटाइपची झलक पाहण्यात आली आहे. ही बाईक पहिल्यांदाच कॉन्सेप्ट म्हणून नव्हे तर खऱ्या स्वरूपात दाखवण्यात आली आहे. Ola Diamondhead मध्ये कोणत्या खास फीचर्ससह आणता येईल त्याबद्दल जाणून घेऊयात.
ऑगस्ट 2023 मध्ये ओला डायमंडहेडला फ्यूचरिस्टिक डिझाइन स्टडी म्हणून सादर करण्यात आले. अलीकडेच एक टीझर रिलीज करण्यात आला आहे, जो त्याच्या टेस्टिंग मॉडेलची झलक देतो. कंपनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन 2025 रोजी ते प्रदर्शित करेल.
ओला डायमंडहेडला अतिशय फ्यूचरिस्टिक डिझाइन देण्यात आले आहे. त्यात हिऱ्याच्या आकाराचे फेअरिंग, समोर पसरलेली सतत एलईडी हेडलाइट स्ट्रिप आणि क्लिप-ऑन हँडलबार आहेत.
ओला डायमंडहेड इलेक्ट्रिक बाईकमध्ये एक मोठा फ्रंट स्विंगआर्म आहे, जो ट्रॅडिशनल फोर्कऐवजी हब-सेंटर स्टीअरिंग सिस्टम वापरण्यास सूचित करतो. हब-सेंटर स्टीअरिंग सिस्टम फोर्कपेक्षा चांगली स्थिरता आणि हँडलिंग प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. दुसरीकडे, ती साध्या फोर्क-माउंटेड हँडलबारइतकी थेट स्टीअरिंग फील देऊ शकत नाही.
दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी
ओला डायमंडहेड प्रीमियम इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये आणली जाऊ शकते, ज्यामुळे ती थेट अल्ट्राव्हायोलेट F77 शी स्पर्धा करेल. असा अंदाज आहे की या बाईकची किंमत सुमारे 4.5 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते.