
फोटो सौजन्य: @AarizRizvi/ X.com
ह्युंदाई व्हेन्यू ही भारतातील लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे, जी तिच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. म्हणूनच तर याचे नवीन जनरेशन लाँच झाल्यापासून, या एसयूव्हीला खूप डिमांड पाहायला मिळाली. चला या कारच्या विक्रीबद्दल जाणून घेऊयात.
रिपोर्ट्सनुसार, नवीन व्हेन्यूच्या लाँचनंतर फक्त एका महिन्यात या SUV ला ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या मॉडेलसाठी 32 हजार युनिट्सची बुकिंग नोंदवली गेली आहे.
कंपनीकडून ऑफर केली जाणारी नवीन जनरेशन Venue अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्ससह येते. यात समाविष्ट आहेत:
ह्युंदाई या एसयूव्हीसाठी दोन पेट्रोल इंजिन पर्याय ऑफर करते. यात एक 1.2-लिटर एमपीआय पेट्रोल इंजिन आहे, जे 61 किलोवॅट पॉवर आणि 114.7 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन फक्त पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह दिले जाते.
ह्युंदाईने भारतात नवीन-जनरेशन व्हेन्यू 7.89 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. यांच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 15.69 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाईची नवीन जनरेशन व्हेन्यू Maruti Brezza, Kia Syros, Tata Nexon, Kia Sonet, Mahindra XUV 3XO आणि Skoda Kylaq सारख्या एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.