Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

अनेकदा मोठ्या स्पीड ब्रेकरमुळे कार घासली जाते. हीच बाब लक्षात घेत, आज आपण उंच ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 03:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • मोठमोठ्या स्पीड ब्रेकरमुळे नेहमीच कार घासल्या जातात
  • यामुळे कारच्या बॉडीचे नुकसान होते
  • म्हणूनच आज आपण उंच ग्राउंड क्लिएअरन्स असणाऱ्या कारबद्दल जाणून घेऊयात
भारतात कार खरेदी करताना ग्राउंड क्लीयरन्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात कार खडबडीत रस्त्यावर चालवली जाते किंवा एखादा मोठा स्पीड ब्रेकर पार करते. तेव्हाच आपल्याला ग्राउंड क्लिअरन्सचे महत्व समजते.

शहरांतील खोल खड्डे, कोणतीही खूण नसलेले उंच स्पीड-ब्रेकर किंवा गावाकडील कच्चे रस्ते अशा परिस्थितीत गाडी जमिनीपासून जास्त उंच असल्यास ड्रायव्हिंग अधिक सोपे आणि सुरक्षित होते. त्यामुळे आज आपण भारतातील उत्तम 5 Compact SUV बद्दल माहिती देणार आहोत, ज्यांचा ग्राउंड क्लीयरन्स खूप चांगला आहे.

ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta)

ही SUV सुमारे 190 mm ग्राउंड क्लीयरन्ससह येते, त्यामुळे ती दैनंदिन वापरासाठी योग्य मानली जाते. इतकी उंची असल्यामुळे शहरातील खराब रस्ते आणि मोठे स्पीड-ब्रेकर सहज पार करता येतात. त्यामुळे कारच्या तळाला धक्का लागण्याची शक्यता कमी होते. या SUV मध्ये 1.5 लिटर पेट्रोल, टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

टाटा हॅरियर (Tata Harrier)

टाटा हॅरियरमध्ये 205 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो, त्यामुळे उबड-खाबड रस्त्यांवर ही SUV अधिक सक्षम ठरते. यामध्ये प्रशस्त केबिन, मोठा बूट स्पेस आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स दिले आहेत. ही SUV प्रामुख्याने 2.0 लिटर पॉवरफुल डिझेल इंजिनसह येते, जे दमदार परफॉर्मन्स देते.

होंडा एलिव्हेट (Honda Elevate)

220 mm ग्राउंड क्लीयरन्ससह होंडा एलिवेट ही या यादीतील सर्वात उंच SUV मानली जाते. त्यामुळे मोठे खड्डे किंवा उंच स्पीड-ब्रेकर पार करताना गाडीच्या तळाला धक्का लागण्याची शक्यता खूपच कमी असते. यामध्ये मोठा बूट स्पेसही मिळतो. या SUV मध्ये 1.5 लिटर नॅचरल्ली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर (Toyota Urban Cruiser Hyryder)

टोयोटा हाय्रायडरमध्ये सुमारे 210 mm ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे, त्यामुळे खराब रस्ते आणि खड्डे असलेल्या मार्गांवर ही SUV सहज चालते. या गाडीत 1.5 लिटर स्ट्राँग-हायब्रिड आणि 1.5 लिटर पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळतात. जास्त मायलेज हवे असणाऱ्यांसाठी यामध्ये CNG पर्यायही उपलब्ध आहे.

किया सेल्टोस (Kia Seltos)

किया सेल्टोस सुमारे 200 mm ग्राउंड क्लीयरन्ससह येते, ज्यामुळे ती खराब रस्त्यांसाठी चांगला पर्याय ठरते. आधुनिक फीचर्स, प्रगत तंत्रज्ञान आणि आरामदायी ड्रायव्हिंगसाठी ही SUV ओळखली जाते. यामध्ये नॅचरल्ली एस्पिरेटेड पेट्रोल, टर्बो-पेट्रोल आणि टर्बो-डिझेल असे तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. या इंजिनमधून सुमारे 113 bhp ते 158 bhp इतकी पॉवर मिळते.

Web Title: Best 5 compact suv with high ground clearance kia seltos tata harrier

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Seltos
  • SUV

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.