Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फास्टॅग संपणार, जीपीएस टोल येणार; बँक खात्यातून थेट पैसे कट होणार! जाणून घ्या जीपीएस टोल सिस्टीमचं संपूर्ण गणित

भारतात येणारी सॅटेलाईट टोल सिस्टीम किलोमीटरच्या हिशोबाने बँक खात्यातून थेट पैसे कट करेल, ज्यामुळे टोल नाक्यांवरील गर्दी संपेल. तांत्रिक चुकांसाठी एनएचएआय (NHAI) कडून हेल्पलाइन आणि रिफंडची सोय केली जाईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 08:38 PM
फास्टॅग संपणार, जीपीएस टोल येणार; बँक खात्यातून थेट पैसे कट होणार! जाणून घ्या जीपीएस टोल सिस्टीमचं संपूर्ण गणित
Follow Us
Follow Us:

भारतातील हायवेजवर प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी सरकारने फास्टॅग आणला. पण आता तंत्रज्ञान आणखी पुढे जात आहे. भारत सरकार लवकरच फास्टॅगच्या जागी ‘सॅटेलाईट बेस्ड टोल सिस्टीम’ (GNSS/GPS Toll) सुरू करत आहे. या नव्या प्रणालीमध्ये टोल नाक्यावर गाडी थांबवण्याची किंवा स्कॅन करण्याची अजिबात गरज पडणार नाही.

ही सिस्टीम काम कशी करते?

या नव्या तंत्रज्ञानामध्ये गाडीच्या काचेवर किंवा डॅशबोर्डवर एक ‘ऑन-बोर्ड युनिट’ (OBU/वैयक्तिक ट्रॅकिंग डिव्हाईस) बसवले जाईल. नवीन गाड्यांमध्ये हे इन-बिल्ट येईल, तर जुन्या गाड्यांमध्ये ते नंतर बसवावे लागेल. जेव्हा तुमची गाडी हायवेवर प्रवेश करेल, तेव्हा अवकाशातील सॅटेलाईट (भारताची स्वदेशी ‘नाविक’ यंत्रणा) तुमच्या गाडीच्या थेट संपर्कात येईल. तुम्ही महामार्गावर नेमका किती किलोमीटर प्रवास केला, याचे अचूक मोजमाप केले जाईल. तुम्ही हायवेवरून बाहेर पडताच, त्या अंतराचे पैसे तुमच्या जीपीएसशी लिंक असलेल्या बँक खात्यातून किंवा डिजिटल वॉलेटमधून आपोआप वजा होतील.

याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘पे-ॲज-यू-यूज’ नियम. सध्या फास्टॅगमध्ये संपूर्ण टप्प्याचे पैसे कट होतात, मग तुम्ही हायवेवर २ किमी प्रवास करा की २० किमी. पण नव्या सिस्टीममध्ये तुम्ही जेवढे किलोमीटर हायवे वापराल, तेवढ्याच अंतराचे पैसे द्यावे लागतील.

Auto News: सरकारचे आता ‘या’ गाड्यांसाठी खास गिफ्ट, घेऊन येत आहे स्पेशल FAStag, एकही पैसा न देता Toll करता येणार पार

तांत्रिक घोळ झाल्यास काय करावे?

जीपीएस ही डिजिटल सिस्टीम असल्याने इंटरनेट रेंज जाणे किंवा तांत्रिक त्रुटी निर्माण होणे साहजिक आहे. जर सिस्टीममधील चुकीमुळे कमी प्रवास करूनही जास्त पैसे कट झाले, तर काळजी करण्याची गरज नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) विशेष ‘तक्रार निवारण केंद्र’ आणि ‘१०३३’ हा हेल्पलाइन क्रमांक यासाठी उपलब्ध असेल. बँक स्टेटमेंट आणि प्रवासाचा तपशील देऊन पैसे रिफंड मिळवता येतील.

Hormuz Toll : महासत्तेचा अपमान की इराणचा विजय? होर्मुझच्या सामुद्रधुनीतून टोल वसुलीची पहिली रोख रक्कम प्राप्त

तसेच, इंटरनेट रेंज नसलेल्या भागात हे डिव्हाईस ऑफलाईन डेटा स्टोअर करेल आणि रेंज परत आल्यावर टोलची अचूक रक्कम कापली जाईल. जर तुमचे डिव्हाईस बंद पडले असेल, तर हायवेवरील कॅमेरे नंबर प्लेट स्कॅन करून टोल वसूल करतील.

 

 

 

Web Title: New gps system technology auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • FASTag
  • GPS

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.