फोटो सौजन्य: Pinterest
Hyundai Venue चा नवीन व्हेरिएंट, HX 5 Plus सादर केला आहे. हा व्हेरिएंट HX 5 आणि HX 6 च्या दरम्यान स्थित आहे. हा नवीन व्हेरिएंट परवडणाऱ्या किमतीत काही प्रीमियम फीचर्ससह आणला गेला आहे. नवीन Hyundai Venue व्हेरिएंटमध्ये कोणते खास फीचर्स आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI
कंपनीने या ह्युंदाई व्हेन्यूचे एकूण तीन पेट्रोल मॅन्युअल वेरिएंट्स बाजारात सादर केले आहेत. बेस व्हेरिएंट HX 5 पेट्रोल MT ची एक्स-शोरूम किंमत 9.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यापुढील नव्याने सादर करण्यात आलेला HX 5 प्लस पेट्रोल MT व्हेरिएंट 10 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असून, यात अधिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर टॉप व्हेरिएंट असलेल्या HX 6 पेट्रोल MT ची एक्स-शोरूम किंमत 10.43 लाख रुपये आहे, जो अधिक प्रीमियम फीचर्स आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव देतो.
Hyundai Venue HX 5 Plus मध्ये काही फीचर्स जोडण्यात आली आहेत, जी पूर्वी फक्त टॉप व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होती.
या सेगमेंटमध्ये Hyundai Venue ला अनेक मजबूत एसयूव्हींशी स्पर्धा करावी लागत आहे. यामध्ये Tata Nexon, Kia Sonet, Maruti Brezza, Mahindra XUV 3XO, Renault Kiger, Skoda Kylaq, Nissan Magnite, Toyota Taisor आणि Maruti Fronx यांचा समावेश आहे.
Hyundai Venue HX 5 Plus व्हेरिएंट हा अशा ग्राहकांसाठी एक बेस्ट पर्याय ठरतो, ज्यांना आवश्यक फीचर्ससोबत थोडा प्रीमियम अनुभव हवा आहे, मात्र थेट टॉप व्हेरिएंटकडे जाण्याची गरज वाटत नाही.






