
फोटो सौजन्य: Pinterest
10 वेळा किक मारली आणि सेल्फ स्टार्टवर सुद्धा बाईक चालू होईना! ‘या’ सोप्या टिप्स वापरून पाहाच
किआने या एसयूव्हीला दोन पेट्रोल आणि एका डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर केले आहे. या एसयूव्हीमध्ये 1.5 -लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे जे 115 पीएस पॉवर आणि 144 एनएम टॉर्क निर्माण करते. दुसरा पर्याय 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे जे 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क निर्माण करते. डिझेल इंजिन हे 1.5-लिटर इंजिन आहे जे 116 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीमध्ये मॅन्युअल, आयव्हीटी, आयएमटी आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय आहेत.
होंडा एलिव्हेटमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटीचा समावेश आहे.
किआकडून नव्या जनरेशन सेल्टोसमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या SUV मध्ये 30 इंचाचा ट्विन पॅनोरॅमिक डिस्प्ले देण्यात आला असून, त्यामध्ये 12.3 इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स, 10-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, बोसचे 8 स्पीकर असलेली प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, नवीन एसी कंट्रोल्स आणि पॅनोरॅमिक सनरूफही देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या SUV मध्ये 21 सेफ्टी फीचर्ससह Level-2 ADAS, ABS, EBD आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरजेसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
दरवाढी करण्यात आता Triumph ची देखील उडी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढवू शकते Bikes ची किंमत
दुसरीकडे, Honda Elevate मध्ये एलईडी DRL, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, पुढील व मागील बंपरवर सिल्व्हर स्किड गार्निश, 16 आणि 17 इंचांचे अलॉय व्हील्स, शार्क फिन अँटेना आणि बॉडी-कलर डोअर मिरर देण्यात आले आहेत. इंटीरियरमध्ये सिंगल पॅन सनरूफ, बेज आणि ब्लॅक थीम, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, PM 2.5 केबिन एअर प्युरिफायर, ऑटो डोअर लॉक-अनलॉक, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील, ड्रायव्हर सीट हाइट अॅडजस्टर, 60:40 स्प्लिट रियर सीट, 10.25 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँबियंट लाइटिंग आणि फोल्डेबल ग्रॅब हँडल्ससारखे अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत.
किआने नुकतीच नवीन जनरेशनची सेल्टोस सादर केली आहे. या एसयूव्हीची किंमत येत्या नवीन वर्षात 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाईल. तर, होंडा एलिव्हेटची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16.67 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
एकूणच, जर तुम्हाला जास्त पॉवर, आधुनिक फीचर्स आणि प्रीमियम अनुभव हवा असेल तर Kia Seltos योग्य ऑप्शन ठरेल. मात्र, सोपा वापर आणि बजेटमध्ये मजबूत SUV शोधत असाल तर Honda Elevate तुमच्यासाठी अधिक योग्य ठरू शकते.