फोटो सौजन्य: iStock
निस्सान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (NMIPL) ने भारत सरकारकडून जाहीर झालेल्या नवीन GST दरांचे स्वागत करत आपल्या ग्राहकांना त्याचा पूर्ण लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निस्सानच्या लोकप्रिय बी-एसयूव्ही न्यू निस्सान मॅग्नाइटच्या किमतीत 1 लाख रुपयांपर्यंत घट झाली असून, ग्राहकांसाठी कार खरेदी करणे आणखी सुलभ झाले आहे.
सुधारणेनंतर मॅग्नाइट व्हिसिया MT व्हेरिएंट आता 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. यामुळे भारतातील सर्वात सुरक्षित बी-एसयूव्ही म्हणून तिचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. त्याचप्रमाणे एन-कनेक्टा CVT आणि कुरो CVT व्हेरिएंट्स आता 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असून, प्रगत वैशिष्ट्यांसह प्रीमियम स्टाइलिंग शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे.
टॉप-एंड व्हेरिएंट्समध्ये, CVT टेक्ना आणि CVT टेक्ना+ अनुक्रमे अंदाजे 97,300 रुपये आणि 1,00,400 रुपयांनी कमी दरात उपलब्ध झाले आहेत. याशिवाय, CNG रेट्रोफिटमेंट किट आता 71,999 रुपयांत उपलब्ध असून त्यात ग्राहकांना 3,000 रुपयांची बचत मिळेल. हे किट सरकार-मान्यताप्राप्त विक्रेता मोटोझेनने विकसित केले असून, 3 वर्षे/1 लाख किमी वॉरंटीसह येते.
तगडा लूक, तगडी किंमत! Suzuki Hayabusa चा स्पेशल एडिशन ग्लोबल लेव्हलवर सादर
या घोषणेवर भाष्य करताना, निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले,
“ही जीएसटी कपात ऑटो उद्योगासाठी वेळेवर आलेले प्रोत्साहन असून हा ग्राहकांचा विजय आहे. निसानमध्ये आम्ही ग्राहकांना अधिक परवडणारी किंमत व सुलभता देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून (नवरात्रीच्या पहिल्या दिवशी) लागू होतील. मात्र, ग्राहकांना देशभरातील अधिकृत निस्सान डीलरशिपमध्ये लगेचच नवीन दरांवर कार बुक करता येईल.
न्यू निस्सान मॅग्नाइटच्या सुधारित दर श्रेणीत ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. जीएसटी कमी झाल्यानंतर बेस व्हेरिएंट MT Visia ची किंमत पूर्वीच्या 6,14,000 वरून कमी होऊन 5,61,600 झाली आहे, तर MT Visia+ आता 6,64,000 ऐवजी 6,07,400 मध्ये उपलब्ध आहे. मिड-लेव्हल व्हेरिएंट्समध्ये MT Acenta 7,29,000 वरून 6,66,800, तर MT N-Connecta 7,97,000 वरून 7,29,000 इतकी झाली आहे. स्पेशल MT Kuro Edition 8,30,500 ऐवजी 7,59,600 मध्ये मिळणार आहे. प्रीमियम व्हेरिएंट्समध्ये MT Techna ची किंमत 8,92,000 वरून 8,15,900, तर MT Techna+ 9,27,000 वरून 8,48,000 झाली आहे.
लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर
ऑटोमेटेड EZ-Shift व्हेरिएंट्समध्ये, Visia आता 6,74,500 वरून 6,16,900 रुपये, Acenta 7,84,000 वरून 7,17,100 रुपये, N-Connecta 8,52,000 वरून 7,79,300 रुपये आणि Kuro Edition 8,85,500 वरून 8,09,900 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे Techna ₹9,47,000 वरून ₹8,66,200, तर Techna+ 9,82,000 वरून 8,98,200 रुपये झाली आहे.
Turbo MT श्रेणीत, N-Connecta ₹9,38,000 वरून ₹8,57,900, Kuro Edition ₹9,71,500 वरून ₹8,88,600, Techna 10,18,000 वरून 9,31,100 रुपये आणि Techna+ 10,54,000 वरून 9,64,000 रुपयांइतकी झाली आहे.
टॉप-एंड Turbo X-Tronic CVT व्हेरिएंट्समध्ये, Acenta 9,99,400 वरून 9,14,100 रुपये, N-Connecta 10,53,000 वरून ₹9,63,100 रुपये, Kuro Edition 10,86,500 वरून 9,93,800 रुपये, Techna 11,40,000 वरून 10,42,700 रुपये आणि फ्लॅगशिप Techna+ 11,76,000 वरून 10,75,600 रुपयांइतकी झाली आहे.