Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Maintenance Tips: गाडी चालवण्यासोबतच तिची देखभालही आहे महत्त्वाची; कारसाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

कारचा वाढता खर्च कमी करायचा आहे का? विमा प्रीमियममध्ये बचत करण्यापासून ते मायलेज वाढवण्यापर्यंतच्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स या लेखात वाचा. तुमची कार फिट ठेवा आणि पैसे वाचवा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 05:25 PM
Car Maintenance Tips (Photo Credit - X)

Car Maintenance Tips (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • गाडी चालवण्यासोबतच तिची देखभालही आहे महत्त्वाची
  • कारसाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स
Car Maintenance Tips News Marathi: आजच्या काळात कार असणे ही गरज असली तरी, तिचा वाढता खर्च सामान्य माणसाच्या खिशावर ताण निर्माण करतो. पेट्रोल-डिझेलचे दर, मेंटेनन्स आणि विम्याचा हप्ता (Premium) यामुळे गाडी सांभाळणे महागडे झाले आहे. मात्र, काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही दरवर्षी हजारो रुपयांची बचत करू शकता. तुमच्या कारचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि बजेट नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

१. कार विमा प्रीमियममध्ये करा बचत (Insurance Tips)

अनेकांना वाटते की विमा प्रीमियम कमी करणे शक्य नाही, पण योग्य पर्यायाची निवड केल्यास मोठी बचत होते. ‘पे अ‍ॅज यू ड्राईव्ह’ (Pay As You Drive) जर तुमची कार जास्त चालत नसेल, तर हा पर्याय निवडा. यात तुमच्या किलोमीटरनुसार प्रीमियम ठरवला जातो. जर तुमचे वार्षिक रनिंग ५,००० ते ७,००० किमी असेल, तर तुम्ही सामान्य विम्याच्या तुलनेत खूप कमी प्रीमियम भरू शकता.

२. वेळेवर सर्व्हिसिंग म्हणजे पैशांची बचत

लोक अनेकदा पैसे वाचवण्यासाठी सर्व्हिसिंग पुढे ढकलतात, पण यामुळे दीर्घकाळात मोठा फटका बसू शकतो. वेळेवर इंजिन ऑइल बदलणे, ब्रेक तपासणे आणि ट्यूनिंग केल्यामुळे इंजिनवर ताण येत नाही, परिणामी मायलेज वाढते. वेळीच केलेली देखभाल भविष्यातील मोठ्या तांत्रिक बिघाडांना आणि हजारो रुपयांच्या खर्चाला रोखू शकते.

वाहन चालवणे होईल अधिक स्वस्त, CNG च्या किमतीत होणार घट; खिशाला पडणार नाही भगदाड

३. एअर फिल्टरकडे दुर्लक्ष करू नका

कारचे एअर फिल्टर हे इंजिनच्या फुफ्फुसासारखे असते. ते घाणेरडे झाल्यास इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे इंजिनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो आणि गाडी जास्त इंधन खाऊ लागते. प्रत्येक सर्व्हिसिंगला एअर फिल्टर स्वच्छ करा किंवा गरज असल्यास बदलून घ्या. यामुळे गाडीचे मायलेज सुधारण्यास मदत होते.

४. टायर प्रेशर आणि ड्रायव्हिंग स्टाईल

टायर्समध्ये हवा कमी असल्यास इंजिनवर दाब येतो आणि इंधन जास्त वापरले जाते. आठवड्यातून एकदा टायर प्रेशर तपासा. अचानक ब्रेक मारणे किंवा वेगाने गाडी पळवणे टाळा. स्थिर वेगाने गाडी चालवल्यास इंधनाची मोठी बचत होते. योग्य विमा योजना, वेळेवर सर्व्हिसिंग आणि छोट्या तांत्रिक गोष्टींकडे लक्ष दिल्यास कारचा खर्च ओझे वाटणार नाही. थोडेसे प्रसंगावधान आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही दरवर्षी किमान १० ते १५ हजार रुपयांची बचत करू शकता.

जानेवारीत वाहन विक्रीत वाढ! ऑटोमोबाईल क्षेत्राची मोठी झेप, यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा उत्तम कामगिरी

Web Title: Car maintenance tips to save money and increase mileage marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
2

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
3

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
4

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.