फोटो सौजन्य: Freepik
सध्या पावसाचे दिवस चालू आहेत. या मोसमात आपल्याला निसर्गाचे वेगळेच आणि सुंदर रूप पाहायला मिळते. जर तुम्ही सुद्धा या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कुठे तरी फिरायचा प्लॅन बनवत आहात आणि त्यातही तुम्ही तुमची स्वतःची कार घेऊन जाणार आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
बहुतेक जणांसोबत असे होते की त्यांची कार हायवेवर असते आणि अचानक त्यांना समजते की आता आपल्या कारमध्ये पेट्रोल शिल्लक नाही आहे. अशावेळी सर्वात जास्त गोंधळ कार चालकाचा होतो. पण आता एक अशी अफवा पसरवली जात आहे की NHAI कडून तुम्हाला अशा परिस्थितीत 5 ते 10 पेट्रोल फ्री मिळू शकते. पण हे खरं आहे का? चला जाणून घेऊया.
महामार्गावर इंधन संपल्यावर 5 ते 10 लिटर मोफत पेट्रोल देण्याचा NHAI (National Highways Authority of India) चा कोणताही अधिकृत नियम नाही. परंतु, काही महामार्गांवर, विशेषतः टोल प्लाझाच्या आसपास इंधन सहाय्य सेवा उपलब्ध असू शकते, परंतु ही सुविधा विनामूल्य नाही.
NHAI नियमांनुसार, अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर आपत्कालीन सहाय्य सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये वैद्यकीय एमरजेंसी, टायर पंक्चर दुरुस्ती, टोइंग सेवा आणि इतर मदतीचा समावेश आहे. काही ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल देखील पुरवले जाते, परंतु त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागते. ही सुविधा मुख्यतः अशा लोकांसाठी उपलब्ध आहे जे इंधन संपल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अडकून पडले आहेत.
हे देखील वाचा: प्रत्येक कारमध्ये असते ‘हे’ जादूई फीचर, वापर केल्यास मायलेजमध्ये होते कमालीची वाढ
मोफत इंधनासाठी कोणताही नियम नाही: महामार्गावर मोफत पेट्रोल देण्यासाठी NHAI कडून कोणताही अधिकृत नियम जर केलेला नाही.
चार्ज करण्यायोग्य सेवा: काही महामार्गांवर पेट्रोल/डिझेल पुरवण्याची सुविधा असू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
आपत्कालीन सेवा: NHAI अनेक महामार्गांवर 24/7 आपत्कालीन सहाय्य सेवा दिली जाते, ज्यामध्ये इंधन देखील असू शकते, परंतु यासाठी पैसे मोजावे लागतील.
NHAI टोल फ्री नंबर: तुम्हाला इंधन किंवा इतर मदत हवी असल्यास, तुम्ही NHAI हेल्पलाइन नंबर 1033 वर कॉल करून मदत मागू शकता.