
फोटो सौजन्य: Gemini
देशांतर्गत होलसेल विक्री 1,902 युनिट्स इतकी राहिली असून, डिसेंबरमधील एकूण एकत्रित विक्री 15,372 युनिट्स झाली आहे. या कामगिरीमुळे निसानच्या ‘मेड-इन-इंडिया’ निर्यात-केंद्रित धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे.
ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त
निसान मोटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा यांनी सांगितले की, “2025 हे वर्ष निसान मोटर इंडियासाठी स्थैर्य आणि धोरणात्मक प्रगतीचे ठरले. देशांतर्गत विक्री आणि डिसेंबरमधील विक्रमी निर्यातीत न्यू निसान मॅग्नाइटने महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, निसान टेकटॉन C-SUV आणि निसान ग्रॅव्हाइटच्या डिझाइन व नावाचे अनावरण करून कंपनीने पुढील टप्प्याची स्पष्ट दिशा निश्चित केली आहे.”
निसानने भारतासाठी आगामी उत्पादन योजना जाहीर केल्या आहेत.
HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?
निसान आपले डीलरशिप आणि आफ्टरसेल्स नेटवर्क वेगाने वाढवत आहे. कंपनीचे FY 2027 अखेरपर्यंत 250 शोरूम्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे. अलीकडेच हिमाचल प्रदेशातील कांग्रा आणि पंजाबमधील होशियारपूर येथे अत्याधुनिक 3S (Sales, Service, Spares) सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
2025 मध्ये निसानने भारतातून 1.2 दशलक्ष वाहनांची एकूण निर्यात पूर्ण केली आहे. न्यू निसान मॅग्नाइट ही कार सध्या 65 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात होत असून, कंपनीच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ धोरणाचे यशस्वी उदाहरण ठरत आहे.
2020 मध्ये लाँच झालेल्या निसान मॅग्नाइटने 2025 मध्ये 2 लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे. GNCAP 5-स्टार सुरक्षा रेटिंग, 40 पेक्षा अधिक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आणि उद्योगातील पहिली 10 वर्षांची वॉरंटी यामुळे मॅग्नाइट भारतीय तसेच जागतिक ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे.