ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका
ईडीकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी दिल्ली, मुंबई, सूरत, लखनऊ आणि वाराणसी येथे एकूण 9 ठिकाणी झडती मोहीम राबवण्यात आली. ही सर्व ठिकाणे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर अनुराग द्विवेदी तसेच विविध ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजी अॅप्सशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात गुन्ह्याच्या उत्पन्नाचा (POC) वापर करून मनी लॉन्डरिंग केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.
असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
झडतीदरम्यान ईडीने अनुराग द्विवेदी यांच्या लँड रोव्हर डिफेंडर आणि BMW Z4 या दोन आलिशान गाड्या PMLA, 2002 च्या तरतुदीनुसार जप्त केल्या आहेत. यासोबतच अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही हस्तगत करण्यात आली आहेत.
यापूर्वी 17 डिसेंबर रोजी ईडीने लखनऊ, उन्नाव आणि दिल्ली येथे अनुराग द्विवेदी यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी झडती घेतली होती. त्या कारवाईत लॅम्बॉर्गिनी उरुस, मर्सिडीज, फोर्ड एन्डेवर आणि थार यांसह चार महागड्या गाड्या, आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे तसेच सुमारे 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासात यापूर्वी दुबईतील हवाला चॅनेल्सच्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचा मोठा खुलासा झाला होता. यासोबतच विमा पॉलिसी, फिक्स्ड डिपॉझिट आणि बँक खात्यांतील शिल्लक यांसह सुमारे 3 कोटी रुपयांची चल मालमत्ता धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 च्या कलम 17(1A) अंतर्गत जप्त करण्यात आली होती.
Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
ही चौकशी पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने सुरू केली असून, ती बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित आहे. तपासात असेही समोर आले की, सिलिगुडी येथील सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज या आरोपींनी म्यूल बँक खात्यांचा (बनावट खाती) आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून ऑनलाइन सट्टेबाजी पॅनल चालवले होते.
ईडीच्या तपासात असेही आढळून आले आहे की, अनुराग द्विवेदीने बेकायदेशीर सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्सचा सक्रियपणे प्रचार केला. तसेच हवाला चॅनेल्स आणि म्यूल खात्यांद्वारे गुन्ह्याची कमाई मिळवून, त्या पैशांतून दुबईमध्ये स्थिर मालमत्ता खरेदी करण्यात आली.
तपासात हेही स्पष्ट झाले आहे की, अनुराग द्विवेदी सध्या भारताबाहेर दुबईत वास्तव्यास असून, ईडीकडून वारंवार समन्स बजावूनही ते तपासासाठी हजर झालेला नाही. यापूर्वी या प्रकरणात ईडीने तीन आरोपींना अटक केली असून, 1 ऑगस्ट 2025 रोजी माननीय विशेष न्यायालय (PMLA), कोलकाता येथे अभियोजन तक्रार दाखल करण्यात आली होती.
याशिवाय, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत सुमारे 27 कोटी रुपयांची चल मालमत्ता फ्रीज करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.






