Norton Manx R and Atlas GT Motorcycles (फोटो सौजन्य-AI एआय)
ब्रिटिश प्रीमियम मोटरसायकल ब्रँड नॉर्टन भारतात आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या Norton Manx R आणि Norton Atlas GT या 2 नवीन बाइक्सचे डिझाइन पेटंट भारतात दाखल केले आहे. त्यामुळे या दोन्ही मोटरसायकल लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापैकी Manx R ही कंपनीची पहिली सुपरबाइक ठरू शकते. तिचे लाँच Q1 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे, तर Atlas GT Q2 2027 मध्ये भारतात येऊ शकते.
नॉर्टनने EICMA 2025 मध्ये Manx, Manx R, Atlas आणि Atlas GT अशा 4 नवीन मोटरसायकल सादर केल्या होत्या. त्यापैकी Manx R ही फुली फेयर्ड सुपरस्पोर्ट्स बाइक आहे. या बाइकला LED लाइटिंग, सिग्नेचर DRL, अंडरस्लंग एक्झॉस्ट, सिंगल साइडेड स्विंगआर्म आणि कार्बन फायबर बॉडी पॅनल्स देण्यात आले आहेत. तसेच कार्बन फायबर व्हील्समुळे तिचे प्रीमियम डिझाइन आणखी उठून दिसते.
Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?
Norton Manx R मध्ये 8 इंचांची टचस्क्रीन TFT डिस्प्ले देण्यात आली आहे. यामध्ये GoPro इंटिग्रेशन आणि Norton अॅपद्वारे रिमोट अॅक्सेसची सुविधा मिळते. रेन, रोड, स्पोर्ट आणि 2 कस्टमाइजेबल ट्रॅक अशा 5 रायडिंग मोड्सचा समावेश आहे. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, लीन सेन्सिटिव्ह ABS आणि क्विकशिफ्टरसारखी फीचर्स मिळतात.
या सुपरबाइकला 1,200 cc लिक्विड कूल्ड V4 इंजिन मिळते. हे इंजिन 11,500 rpm वर 203 bhp पॉवर आणि 9,000 rpm वर 130 Nm टॉर्क जनरेट करते. बाइकचे वजन 204 किलो असून यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
दुसरीकडे, Norton Atlas GT ही रोड टूरिंगसाठी तयार करण्यात आलेली मोटरसायकल आहे. या बाइकचे प्रोडक्शन तामिळनाडूमधील होसूर येथील TVS प्लांटमध्ये सुरू झाले आहे. यात ड्युअल प्रोजेक्टर LED हेडलॅम्प, 17 इंचांची अलॉय व्हील्स, गोल्डन USD फ्रंट फोर्क्स, सिंगल पीस सीट आणि रिअर मोनोशॉक सस्पेन्शन मिळते.
Atlas GT मध्ये 585 cc लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 9,300 rpm वर 69 bhp पॉवर आणि 7,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क देते. यात कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लीन सेन्सिटिव्ह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग, 5 रायडिंग मोड्स आणि बायडायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळतो. या बाइकचे वजन 192 किलो आहे. भारतातील लाँचनंतर नॉर्टनच्या या दोन्ही बाइक्स प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये कशी छाप पाडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.






