Renault Bridger and Bigster at Auto Expo 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय कार मार्केटमध्ये रेनोल्ट आपल्या SUV पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2027 मध्ये Renault Bridger आणि Renault Bigster 7-Seater या 2 नवीन SUV भारतात सादर करण्याची शक्यता आहे. या दोन्ही गाड्यांचे प्रदर्शन Bharat Mobility Global Expo म्हणजेच Auto Expo 2027 मध्ये होऊ शकते. Renault India Upcoming Cars म्हणून या दोन्ही मॉडेल्सकडे पाहिले जात असून, नवीन डिझाइन, पेट्रोल, CNG आणि हायब्रीड इंजिनचे ऑप्शन मिळण्याची अपेक्षा आहे.
रेनोल्ट ब्रिजर SUV ची किंमत किती असेल?
रेनोल्ट ब्रिजर ही 4 मीटरपेक्षा छोटी SUV असेल. या गाडीचे डिझाइन भारतात विकसित करण्यात आले असून, देशांतर्गत आणि जागतिक मार्केटसाठी तिचे प्रोडक्शन केले जाणार आहे. या SUV मध्ये चौकोनी व्हील आर्च, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि मागच्या दरवाजावर स्पेअर व्हील देण्यात येणार आहे. केबिनमध्ये मागच्या प्रवाशांसाठी 200 mm नी रूम आणि 400 लिटरची बूट स्पेस मिळण्याचा दावा आहे.
रेनॉल्ट डस्टर Strong Hybrid E-Tech 160 ची भारतात डिलिव्हरी सुरू! किंमत ₹16.99 लाखांपासून सुरु
फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड आणि पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग आणि ADAS सेफ्टी टेक्नोलॉजी मिळण्याची शक्यता आहे. इंजिनसाठी 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि फॅक्टरी फिटेड CNG असे ऑप्शन असतील. 2028 पर्यंत या SUV चे स्ट्राँग हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हर्जनही आणण्याची कंपनीची योजना आहे. तिची अंदाजे किंमत 7.5 लाख ते 14 लाख रुपये असू शकते. लाँच 2027 च्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षित आहे.
रेनोल्ट बिगस्टरमध्ये 7 सीट्स मिळणार
दुसरीकडे, रेनोल्ट बिगस्टर किंवा बोरेल नावाने ओळखली जाणारी नवीन 7-सीटर SUV भारतात दाखल होऊ शकते. या गाडीची लांबी सुमारे 4.6 मीटर आणि व्हीलबेस 2,702 mm असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स आणि चार्जिंग पोर्ट्स दिले जाऊ शकतात.
या SUV मध्ये ड्युअल स्क्रीन डिजिटल कॉकपिट, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर टेलगेट आणि Level-2 ADAS मिळण्याची अपेक्षा आहे. इंजिनमध्ये 1.3-लिटर टर्बो पेट्रोलसह मॅन्युअल आणि 6-स्पीड DCT गिअरबॉक्स मिळू शकतो. यासोबत 1.8-लिटर स्ट्राँग हायब्रीड इंजिनचा ऑप्शनही असेल. अंदाजे किंमत 13 लाख ते 25 लाख रुपये असू शकते.
कोणत्या गाड्यांशी स्पर्धा होणार?
रेनोल्ट ब्रिजरची टक्कर किया सोनेट, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि महिंद्रा व्हिजन S सोबत होऊ शकते. तर बिगस्टरचा सामना महिंद्रा XUV 7XO आणि टाटा सफारीशी होईल. या दोन्ही SUV च्या किंमती आणि इंजिनचे तपशील समोर आल्यानंतर भारतीय मार्केटमधील त्यांची जागा स्पष्ट होईल.






