Oben Electric द्वारे 'मेगा फेस्टिव्ह उत्सव'ची घोषणा, ग्राहकांना मिळणार अफलातून फायदे
भारतातील आघाडीची देशांतर्गत निर्मित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आजपासून ‘मेगा फेस्टिव्ह उत्सव’ लाँच केला असून, तो त्यांच्या प्रमुख इलेक्ट्रिक मोटरसायकली रॉर ईझी सिग्मा आणि रॉर ईझीसाठी सुरू केलेला देशव्यापी सणासुदीचा उपक्रम आहे. या उत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय ग्राहकांना प्रीमियम इलेक्ट्रिक बाईक अधिक सुलभ दरात उपलब्ध करून देणे आणि शहरांमधील दैनंदिन प्रवासासाठी शाश्वत गतिशीलतेचा स्वीकार वाढवणे हा आहे.
या उपक्रमाद्वारे ग्राहकांना ₹३५,००० पर्यंतचे फायदे दिले जात आहेत. यात ₹२०,००० किंमतीचा आधीपासून समाविष्ट लाभ, ₹१०,००० पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि प्रत्येक खरेदीसोबत एक खात्रीशीर सोन्याचे नाणे मिळणार आहे. त्यासोबतच एका भाग्यवान ग्राहकाला iPhone जिंकण्याची संधी देखील मिळेल. यामुळे ग्राहकांसाठी सणासुदीचा आनंद दुप्पट होईल.
iPhone 17 Pro Max च्या किमतीत मिळतात ‘या’ Second hand Cars, लिस्टमध्ये मोठमोठ्या कारचा समावेश
ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “या सणासुदीच्या हंगामात आमच्या ग्राहकांना अप्रतिम मूल्य देण्यासाठी आम्ही मेगा फेस्टिव्ह उत्सवाची योजना आखली आहे. रॉर ईझी सीरीजमुळे शहरी प्रवासासाठी योग्य असलेल्या, तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि उच्च दर्जाच्या मोटरसायकली उपलब्ध होत आहेत. हा उपक्रम ई-मोटरसायकली अधिक परवडणाऱ्या बनवेल आणि देशभरात इलेक्ट्रिक गतिशीलतेचा स्वीकार वाढविण्यासाठी आमच्या प्रयत्नांना बळकटी देईल.”
या ऑफरमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नुकतीच लाँच झालेली रॉर ईझी सिग्मा, जी पुढील पिढीतील रायडर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. या मोटरसायकलमध्ये IDC 175 किमी पर्यंत रेंज, 95 किमी/ताशी कमाल वेग आणि फक्त 3.3 सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडण्याची क्षमता आहे. त्याशिवाय यात इको, सिटी आणि हॅवॉक असे तीन अॅडॉप्टिव्ह राइड मोड, शहरी परिस्थितीसाठी उपयुक्त रिव्हर्स मोड, तसेच नेव्हिगेशन आणि स्मार्ट अलर्टसह 5-इंच TFT कलर डिस्प्ले देण्यात आला आहे.
ग्राहकांसाठी या मोटरसायकलीत तीन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत – 2.6 kWh, 3.4 kWh आणि 4.4 kWh. यामुळे वापरकर्ते आपल्या दैनंदिन गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात. रॉर ईझी सीरीजची किंमत ₹99,999 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ग्राहक थेट शोरूमला भेट देऊ शकतात किंवा Amazon द्वारे या सणासुदीच्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
किलेस एंट्री, 9 इंच टचस्क्रीन आणि सोबतीला बॅक कॅमेरा! GST कपातीनंतर 76 हजारांनी स्वस्त झाली ‘ही’ कार
सध्या ओबेन इलेक्ट्रिकची उपस्थिती बेंगळुरू, दिल्ली, पुणे, कोची, जयपूर, अमृतसर, हैदराबाद आणि लखनऊसारख्या शहरांत आहे. कंपनीकडे आधीच ५० हून अधिक शोरूम्स आहेत आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १५० हून अधिक शोरूम्सपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे.
भारतीय रायडर्ससाठी आकर्षक ऑफर्स, खात्रीशीर बक्षिसे आणि अत्याधुनिक फीचर्ससह सज्ज मोटरसायकली या सर्व बाबींमुळे ओबेन इलेक्ट्रिकने या सणासुदीच्या हंगामाला एक नवी उंची दिली आहे. कंपनी ग्राहकांना रॉर ईझी सिग्मा आणि रॉर ईझीसोबत या सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमंत्रित करते.