फोटो सौजन्य: @ObenElectric/ X.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगली मागणी मिळते. यातही इलेक्ट्रिक बाईकला ग्राहकांचा भरघोस पाठिंबा मिळतो. म्हणूनच तर फक्त ई स्कूटर ऑफर करणाऱ्या Ola Electric ने इलेक्ट्रिक बाईक देखील ऑफर करण्यास सुरुवात आहे. यासोबत अजून एक कंपनी आहे, जी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईक ऑफर करते. ती म्हणजे Oben Electric.
नुकतेच ओबेन इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने त्यांच्या बाईकवर हजारो रुपयांच्या ऑफर्स घोषित केल्या आहेत. कोणत्या बाईकवर कोणत्या प्रकारच्या ऑफर्स मिळत आहेत? त्यांची किंमत काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Maruti Victoris की Volkswagen Taigun, फीचर्स, मायलेज आणि इंजिनच्या बाबतीत कोणती एसयूव्ही एकदम बेस्ट?
ओबान इलेक्ट्रिक कडून भारतात रोअर इलेक्ट्रिक बाईक ऑफर केली जाते. सध्या कंपनी या बाईकवर फेस्टिव्ह ऑफर देत आहे.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ओबन Rorr बाईक खरेदी केल्यास ग्राहकांना जास्तीत जास्त 35,000 रुपयांपर्यंतची बचत करता येईल. यात Sigma किंवा EZ व्हेरिएंट घेतल्यास थेट 20,000 रुपयांचा लाभ मिळेल, तर 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि प्रत्येक खरेदीवर गोल्ड कॉईन देण्यात येणार आहे. याशिवाय iPhone जिंकण्याचीही संधी उपलब्ध आहे.
GST 2.0 मुळे लक्झरी कारच्या किमतीत सुद्धा मोठी घट, BMW ची ‘ही’ कार तर 7 लाख रुपयांनी स्वस्त झाली
ओबन रॉरच्या संस्थापक आणि सीईओ मधुमिता अग्रवाल यांनी सांगितले की, “मेगा फेस्टिव्ह उत्सव खासकरून ग्राहकांना या सणाच्या काळात उत्कृष्ट फायदे देण्यासाठी आणला आहे, ज्यामुळे ते सहजपणे आमची इलेक्ट्रिक बाईक चालवू शकतील. Rorr EZ सीरिजमध्ये आम्ही अशी बाईक तयार केली आहे जी शहरी प्रवासासाठी वेगवान, विश्वासार्ह आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. ही ऑफर देशभरात अधिकाधिक लोकांनी इलेक्ट्रिक वाहन स्वीकारावे या आमच्या विचाराला बळकटी देते.”
ओबनकडून रॉर बाईकमध्ये 2.6 kWh, 3.4 kWh आणि 4.4 kWh असे बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे तिला जास्तीत जास्त 175 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. यात बसवलेली मोटर या बाईकला 95 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देते आणि केवळ 3.3 सेकंदांत 0 ते 40 किमी प्रतितास स्पीड गाठण्यास मदत करते. तसेच यात ईको, सिटी आणि हेवॉक असे रायडिंग मोड्सही दिलेले आहेत.
कंपनीकडून यात 5 इंचांचा TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नेव्हिगेशन आणि स्मार्ट अलर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
भारतीय बाजारात ओबन रॉर इलेक्ट्रिक बाइकची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते.