फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर करत आहे. यात आता इलेक्ट्रिक बाईकला सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसत आहे. अशातच जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
ऑगस्ट 2025 मध्ये काही धमाकेदार बाईक लाँच होणार आहे. या महिन्यात Triumph, Oben Electric आणि TVS सारख्या मोठ्या ब्रँडच्या पॉवरफुल बाइक्स लाँच होणार आहेत. तुम्हाला स्पोर्टी राईड्सची आवड असेल किंवा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची असेल, तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार या महिन्यात काहीतरी नवीन बाजारात येणार आहे.
मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?
ट्रायम्फ थ्रक्सटन 400 ही एक क्लासिक कॅफे-रेसर स्टाईल बाईक आहे, जी 6 ऑगस्ट 2025 रोजी लाँच केली जाईल आणि याची अंदाजे किंमत 2.60 लाख ते 2.90 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. ही बाईक अशा रायडर्ससाठी आहे ज्यांना स्टाईलसोबतच परफॉर्मन्सही हवा आहे. यात प्रीमियम हार्डवेअरने सुसज्ज असलेले शक्तिशाली 400 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते, ही बाईक आरामदायी रायडिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. तिच्या ब्रिटिश स्टाइल आणि क्लासिक लूकमुळे, ती Yamaha R15 आणि KTM RC 390 सारख्या स्पोर्ट्स बाईकला चांगली स्पर्धा देऊ शकते.
ओबेन रोर ईझेड ही ओबेन इलेक्ट्रिक कंपनीने लाँच केलेली इलेक्ट्रिक बाईक आहे. ही बाईक 5 ऑगस्ट 2025 रोजी बाजारात येईल आणि याची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू होईल. याची अंदाजे किंमत 1.10 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. ही बाईक चांगल्या रेंज आणि पॉवरफुल मोटरसह येते आणि त्यात आधुनिक डिझाइन आणि स्मार्ट फीचर्स देखील आहेत. कमी मेंटेनन्स आणि सरकारी अनुदानामुळे, पेट्रोलपासून मुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगला पर्याय आहे.
भारतात Tesla पाहिलं वाहिलं Charging Station सुरु करणार, कुठे चार्ज करता येणार तुम्ही EV?
TVS Apache RTX 300 ही TVS ची पहिली ॲडव्हेंचर बाईक आहे, ज्याची किंमत अंदाजे 2.50 लाख रुपये असू शकते. ही बाईक 300cc चे RT-XD4 इंजिनने सुसज्ज असेल. ही बाईक 35bhp पॉवर आणि 28.5Nm टॉर्क जनरेट करते. तसेच ही ॲडव्हेंचर टूरिंगसाठी डिझाइन केलेली आहे, ज्यामध्ये मजबूत चेसिस, लांब सस्पेंशन ट्रॅव्हल, LED लाईट्स, TFT डिस्प्ले आणि कनेक्टेड फीचर्स सारखी प्रगत गोष्टी असतील.