
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येत दमदार विक्री होत असते. तसेच, अनेक उत्तम ऑटो कंपन्या देशात दमदार फीचर्ससह उत्तम कार ऑफर करत असतात. नुकतेच ऑक्टोबर 2025 मधील विक्रीचा रिपोर्ट प्रदर्शित करण्यात आला आहे. या महिन्यात फेस्टिव्ह सिझन देखील असल्यामुळे कारच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली. चला जाणून घेऊयात, विक्रीच्या बाबतीत कोणत्या कारने बाजी मारली आहे.
पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर झाली Toyota Hilux 2025, केव्हा होणार लाँच?
टाटा देशभरात विक्रीसाठी अनेक उत्कृष्ट एसयूव्ही ऑफर करते. वृत्तांनुसार, गेल्या महिन्यात टॉप 5 यादीत Tata Nexon सर्वाधिक मागणी असलेली एसयूव्ही होती. गेल्या महिन्यात, या एसयूव्हीच्या 22083 युनिट्स विकल्या गेल्या. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये, Kia Sonet, Kia Syros, Maruti Brezza, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO, आणि Skoda Kylaq सारख्या एसयूव्हींकडून या कारला स्पर्धा करावी लागते.
मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये येणारी Maruti Suzuki Dzire मागील महिन्यात 20,791 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानावर राहिली.
New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI
मारुतीची बजेट एमपीवी Maruti Suzuki Ertiga या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंत केली जाणारी कार आहे. उपलब्ध माहितीनुसार, मागील महिन्यात या कारचे 20,087 युनिट्स विकले गेले आहे.
मारुतीच्या हॅचबॅक सेगमेंटमधील Maruti Wagon R ही कंपनीच्या जास्त विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. मागील महिन्यात या कारच्या 18,970 युनिट्सची विक्री झाली आहे.
ह्युंदाईची मिड-साइज SUV Creta ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. अहवालानुसार, गेल्या महिन्यात या मॉडेलच्या 18,381 युनिट्सची विक्री झाली आहे.
टॉप 5 कार्सव्यतिरिक्त, गेल्या महिन्यात इतर अनेक कार्स लोकप्रिय झाल्या, ज्यात Mahindra Scorpio, Maruti Fronx, आणि Maruti Baleno, Tata Punch, Maruti Swift यांचा समावेश आहे.