
ओला इलेक्ट्रिकनेआपली नवीन S1Z इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीच्या इन-हाउस (स्वयं-विकसित) बॅटरी सेलवर चालणारे हे पहिले उत्पादन आहे. ही स्कूटर दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे: ३.१ kWh व्हेरियंटची किंमत ७९,९९९ रुपये आणि ५.१ kWh व्हेरियंटची किंमत ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
स्वदेशी LFP बॅटरी आणि रेंज
S1Z मध्ये वापरण्यात आलेले सेल हे ओलाच्या ‘भारत सेल’ प्लॅटफॉर्मचा भाग आहेत. बंगळुरू येथील बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये विकसित केलेली आणि तामिळनाडूमधील गिगाफॅक्टरीत तयार केलेली ही ४६-सिरीज लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) केमेस्ट्री आहे. LFP बॅटरी तिच्या जास्त थर्मल स्टेबिलिटी आणि दीर्घ आयुष्यासाठी ओळखली जाते.
किंमत कमी ठेवण्यामागचे कारण
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत बॅटरीचा खर्च हा ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत असतो. बाहेरून (प्रामुख्याने चीनमधून) सेल आयात करण्याऐवजी ओलाने त्यांचे स्वतःच्या देशात उत्पादन केल्यामुळे खर्च कमी झाला आहे, ज्याचा फायदा कंपनी ग्राहकांना देत आहे.
वैशिष्ट्ये आणि रंग
ही स्कूटर ओलाच्या MoveOS 5 सॉफ्टवेअरवर चालते. यामध्ये क्रूझ कंट्रोल, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड, जीपीएस नेव्हिगेशन आणि ओव्हर-द-ऐर (OTA) अपडेट्स मिळतात. तसेच ‘इझी पार्क’ फीचरमुळे अरुंद जागेत स्कूटर चालवणे सोपे होते. ग्राहकांसाठी ही स्कूटर पांढरी, अँथ्रासाइट, स्काय स्प्लॅश ब्लू आणि माचा ग्रीन या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!
डिलिव्हरी आणि विक्री धोरण