फोटो सौजन्य: @narendramodi (X. com)
भारत सरकार टेस्लाला इन-हाऊस मॅन्युफॅक्चरिंगसाठी आग्रह करत आहे, तर अमेरिका, चीन आणि जर्मनीमध्ये आधीच उत्पादन केंद्रे असलेली टेस्ला भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत एंट्री मारण्यास विलंब घेत आहे. पण आता पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्यात झालेल्या भेटीनंतर टेस्ला भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
टेस्लाच्या कार आपल्या हाय परफॉर्मन्स स्पीड आणि अत्याधुनिक फीचर्ससाठी ओळखल्या जातात. जगभरात टेस्लाच्या कारचा एक वेगळाच डंका पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या कारची किंमत सुद्धा अनेकांना धडकी भरवणारी असते. पण आता टेस्लाने भारतीय मार्केटमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीनंतर, ईव्ही उत्पादक कंपनीने भारतातील १३ पदांसाठी नोकऱ्यांची जाहिरात प्रसिद्ध केली. या जॉब पोस्टिंग मार्फतच टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना आखत आहे.
हाय परफॉर्मन्सच्या लक्झरी आणि इलेक्ट्रिक कारवर भारताने लावलेल्या मोठ्या इम्पोर्ट ड्युटीमुळे टेस्ला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास कचरत आहे. आता $40,000 पेक्षा जास्त किमतीच्या कारसाठी ते 110% वरून 70% पर्यंत कमी करण्यात आले आहे, ज्यामुळे टेस्लासाठी बाजारपेठेतील परिस्थिती अधिक अनुकूल झाली आहे.
Mahindra BE6 च्या टॉप व्हेरियंट Pack Three मध्ये जबरदस्त फीचर्स समाविष्ट, रेंज आणि किंमत जाणून घ्या
टेस्ला कंपनी भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारण्यासाठी आपल्या तीन कार लाँच करू शकतात. चला याबद्दल जाणून घेऊया.
नवीन मॉडेल ३ (New Model 3): मॉडेल 3 अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये मॉडेल 3 लाँग रेंज (लांब अंतर पार करण्यासाठी डिझाइन केलेले) ते मॉडेल ३ परफॉर्मन्स ऑल-व्हील ड्राइव्ह समाविष्ट आहेत. या कारची किंमत $29,990 (26.07 लाख रुपये) ते $42,490 (36.94 लाख रुपये) पर्यंत सुरू होते.
सायबरट्रक (Cybertruck): भारतात एसयूव्हीची मोठी मागणी आहे, ज्यामुळे टेस्ला सायबरट्रक देशातील ईव्ही रसिकांसाठी एक परिपूर्ण पर्याय बनते. सायबरट्रक जागतिक स्तरावर देखील बऱ्यापैकी लोकप्रिय मॉडेल आहे आणि याचे वेटिंग पिरियड देखील मोठे आहे. सायबरट्रक फुल चेंज रेंज 320 मैल (500+ किलोमीटर) आहे, ज्याचा टॉप स्पीड 130 मैल (209 किलोमीटर) आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत $79,990 (69.54 लाख) पासून सुरू होते.
अधिकृतपणे कोणतीही कार केव्हा लाँच होणार याची माहिती नसली तरी, कंपनी चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष 25) कधीही त्यांच्या लाँच योजना जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.