
Trump on PM Modi
भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून चांगले आहेत. परंतु ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे दोन्ही देशांतील व्यापारात तूट निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर प्रचंड टॅरिफ लादले आहे. यामुळे भारताला अमेरिकेत वस्तू पाठवणे शक्य नाही. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताशी आणि पंतप्रधान मोदींशी संबंधावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अमेरिकेचे चांगले संबंध आहेत.
परंतु मोदी माझ्यावर नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या नाराजीचे कारण त्यांच्यावर लादलेले टॅरिफ आहे. ट्रम्प यांच्या मते, पंतप्रधान मोदी त्यांच्यावर खुश नाहीत. कारण भारताला मोठ्या प्रमाणात टॅरिफ भरावा लागत आहे. ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. ट्रम्प यांनी भारत आणि नरेंद्र मोदींशी संबंधावर थेट विधान केले आहे.
ट्रम्प यांच्या विधानातून हे स्पष्ट होते की, ट्रम्प अद्यापही भारतावरील टॅरिफ कमी करणार नाहीत. जोपर्यंत भारत पूर्णपणे रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवत नाहीत, तोपर्यंत अमेरिका भारतावर मोठे टॅरिफ लादत राहिले, असा इशारा ट्रम्प यांनी आपल्या विधानातून दिला आहे. यावरुन भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी अनेक वेळा भारताशी संबंध चांगले असल्याचा दावा केला आहे. मात्र भारतावरील टॅरिफ सध्या कमी होण्याची शक्यता दिसून येत नाही. भारत अमेरिकेशी यावर सतत चर्चा करत आहे, परंतु अद्याप कोणताही तोडगा यावर निघालेला नाही.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे म्हटले. परंतु पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.
Ans: अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावले आहे.
Ans: भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारतावर नाराज आहेत.
Ans: ट्रम्प यांच्या विधानावरुन हे स्पष्ट होते की, ट्रम्प अजूनही भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे नाराज आहेत. यामुळे अमेरिका आणि भारतील व्यापार तणाव, भारतावरील टॅरिफ वाढण्याची शक्यता आहे.